काल गुजरातमधील एका हॉटेलच्या सेप्टिक टँकमध्ये गुदमरून सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. गुजरातेतील या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये २२ आणि २४ वर्षांची तरूण मुले होती. त्यामुळे अनेकांनी या घटनेनंतर संताप व्यक्त केला. सोशल मीडियावर सक्रिय असलेले आनंद महिन्द्रा हेही त्यापैकीच एक. आनंद महिन्द्रा यांनी गुजरातमधील या दुर्दैवी घटनेबद्दल ट्वीट करत आपला संताप व्यक्त केला.‘आता खूप झाले. लोकांच्या आयुष्याशी खेळणे पुरे झाले. काही दिवसांपूर्वी मी स्वयंचलीत स्कॅव्हेंगिंग मशीनबद्दल ट्वीट केले होते. एका होतकरू मुलाने हे मशिन तयार केले आहे. इतरांनीही वेग वेगळ्या पद्धतीने हे मशीन तयार केले आहे. त्यांनी बनवलेले मशिन स्वीकारण्यात कुठली अशी अडचण येतेय. मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यासाठी पैसा कसा उभा करायचा हा प्रश्न असेल तर माझा विचार नक्की व्हावा,’ असे आनंद महिन्द्रा यांनी ट्वीटमध्ये लिहिले.
OMG! इतके करूनही अमिताभ बच्चन झालेत ट्रोल!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2019 15:22 IST
काल गुजरातमधील एका हॉटेलच्या सेप्टिक टँकमध्ये गुदमरून सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अमिताभ बच्चन यांनीही ट्वीट केले अन् ते ट्रोल झालेत.
OMG! इतके करूनही अमिताभ बच्चन झालेत ट्रोल!!
ठळक मुद्देबिग बी यांच्या या ट्वीटवर संमिश्र प्रतिसाद उमटताना दिसत आहेत.