Join us
Daily Top 2Weekly Top 5

अमिताभ बच्चन-शाहरूख खान यांचा फनी Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 19:45 IST

बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन व शाहरूख खान यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन व शाहरूख खान यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ शाहरूख खानने शेअर केला आहे. शाहरूख खानची निर्मिती असलेला 'बदला' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात अमिताभ बच्चन व तापसी पन्नू मुख्य भूमिकेत आहेत. 

शाहरूख खानने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओत शाहरूख व अमिताभ बच्चन मस्ती करताना दिसत आहेत. ते दोघेही विनोदी अंदाजात दिसत आहेत. व्हिडिओ शेअर करून शाहरूखने लिहिले की,'एक वेळ अमिताभ बच्चन यांच्यासोबत. या सर्व मस्ती, प्रेम व चर्चेदरम्यान आम्ही सेल्फी व्हिडिओदेखील घेतला.' व्हिडिओची सुरूवात अमिताभ व शाहरूख यांच्या बातचीतने होते. अमिताभ, शाहरूखला म्हणतात की तुझ्यासोबत व्हिडिओ करताना मला खूप अभिमान वाटतो आहे कारण आपण एकत्र चित्रपटात काम केले मात्र व्हिडिओ केला नाही.

अमिताभ बच्चन शाहरूखला म्हणतात की, 'प्लीज हे तू जरूर प्रसिद्ध कर. कारण माझ्यासाठी ऐतिहासिक बाब आहे.' त्यावर शाहरूख म्हणाला की, 'नाही सर, माझ्यासाठी हे ऐतिहासिक आहे आणि मला तुमच्यासोबत गाण्याची इच्छा आहे. तुमच्याच चित्रपटातील गाणे आहे आणि तुम्ही माझ्यासोबत गा...' त्यानंतर शाहरूख व अमिताभ बच्चन दोघे 'एक दुसरे से करते हैं प्यार हम' हे गाणे गाताना दिसत आहेत. हे गाणे गाताना दोघे मस्ती करताना व एकमेकांची मस्करी करताना दिसत आहेत. हा त्या दोघांचा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत असून त्याला खूप लाइक्स व शेअर होत आहे. 

शाहरूख खानचा प्रोडक्शन हाऊस रेड चिलीज एण्टरटेन्मेंटच्या 'बदला' चित्रपटात अमिताभ बच्चन मुख्य भूमिका करत आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अमिताभ बच्चन व शाहरूख खान एक सीरिज करत आहेत आणि ते व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

टॅग्स :अमिताभ बच्चनशाहरुख खानबदला