Join us

अमिताभ बच्चन यांचा मोठा खुलासा, ७५ टक्के लिव्हर निकामी आणि गंभीर आजाराशी करताहेत सामना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 12:52 IST

अमिताभ बच्चन यांनी सांगितलं की, त्यांचं ७५ टक्के यकृत निकामी झालं आहे आणि फक्त २५ टक्के यकृतावर ते जिवंत आहेत.

बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपतीमुळे सध्या चर्चेत आहेत. त्यांच्या बोलण्याची स्टाईल व शोमध्ये एन्ट्री करण्याची पद्धत याचं सगळीकडे खूप कौतूक होत आहे. ७६ वर्षीय अमिताभ बच्चन यांच्या पर्सनॅलिटीचे सगळेच जण कौतूक करत असतात. तुम्हाला माहित आहे का, अमिताभ बच्चन यांचे ७५ टक्के यकृत निकामी झालं आहे आणि ते एका गंभीर आजाराशी सामना करत आहेत. 

अमिताभ बच्चन यांनी त्याच्या प्रकृतीबाबतचा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितलं की, त्यांचे लिव्हर ७५ टक्के खराब झालं आहे आणि २५ टक्के लिव्हर ते जिवंत आहेत. छोट्या पडद्यावरील एका कार्यक्रमात बिग बींनी सांगितलं की, मला हे सांगताना अजिबात वाईट वाटत नाही की ट्युबरक्लोसिस व हेपेटाइटिस बीने पीडित आहे. 

पोलिओ, हेपेटाइटिस बी, टीबी, डायबिटीज यांसारख्या आजारांबाबत जनजागृती करणाऱ्या मोहिमेशी जोडलेल्या अमिताभ बच्चन यांनी लोकांना चाचणी व उपचार करण्याचे आवाहन केलं आहे. अमिताभ बच्चनने सांगितलं की, टीबीसारख्या आजारावर उपचार होते. मला जवळपास ८ वर्षांपर्यंत माहित नव्हते की मला टीबी आहे. मी सांगतोय की माझ्यासोबत जे झालं आहे ते कुणासोबतही होऊ शकतं.

 

जर तुम्ही टेस्ट करण्यासाठी तयार नसाल तर तुम्हाला समजणारही नाही आणि मग उशीर झाल्यामुळे उपचारही होऊ शकणार नाही.

टॅग्स :अमिताभ बच्चन