Join us

अमिताभ बच्चन यांनी या नावाने मोबाईलमध्ये सेव्ह केला आहे जया बच्चन यांचा नंबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 17:50 IST

जया यांचं नाव त्यांनी मोबाइलमध्ये काय नावाने सेव्ह केलं आहे, याबद्दल कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात त्यांनी सांगितले होते.

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते. बॉलिवूडमधील सगळ्यात प्रसिद्ध जोडींपैकी ही एक जोडी असून या दोघांविषयी एक खास सिक्रेट अमिताभ यांनीच कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात काही वर्षांपूर्वी सगळ्यांना सांगितले होते.

जया यांचं नाव त्यांनी मोबाइलमध्ये काय नावाने सेव्ह केलं आहे, याबद्दल कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात त्यांनी सांगितले होते. कौन बनेगा करोडपतीच्या 11 व्या सिझनमध्ये उत्तराखंडमधून आलेला सुमित तडियाल नावाचा एक स्पर्धक अमिताभ यांच्यासमोर  हॉट सीटवर बसला होता. कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात येणारे अनेक स्पर्धक अमिताभ यांना त्यांच्या खाजगी आयुष्याविषयी विचारत असतात. या स्पर्धकासोबत त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी गप्पा मारल्या होत्या. या गप्पांच्या ओघात अमिताभ यांनी सांगितलं होतं की, 'मी जया यांचा नंबर माझ्या मोबाइलमध्ये JB या नावाने सेव्ह केला आहे.

कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचे आजवर सगळेच सिझन गाजले असून पुढील सिझन प्रेक्षकांच्या भेटीस केव्हा येणार याची लोक आतुरतेने वाट पाहात असतात. 

टॅग्स :अमिताभ बच्चनजया बच्चन