Join us

"कुणास ठाऊक, अजून काय काय पाहायला मिळेल…" अमिताभ बच्चन यांची अभिषेकसाठी पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 15:59 IST

अमिताभ बच्चन यांचं ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

Amitabh Bachchan Praises Abhishek Bachchan: बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्याचे केवळ भारतातच नाही तर जगभरात असंख्य चाहते आहेत.  ते  सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात.  त्यांच्या ट्विटर अकाउंटवर ते व्यक्त होत असतात. नुकतंच त्यांनी लेक अभिषेक बच्चनसाठी ट्विट करत कौतुकाची थाप दिली आहे. 

अभिषेक बच्चनच्या कामगिरीबाबत त्यांनी केलेलं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. अमिताभ यांनी लिहलं, "एका वर्षात तीन चित्रपट केले आणि तिन्ही वेगवेगळ्या भूमिका... 'आय वॉन्ट टू टॉक', 'हाऊसफुल ५' आणि 'कालीधर लापता'... या तिन्हीमध्ये असा अभिनय जो इतर सर्व पात्रांपेक्षा वेगळा आहे. कुठेही असं वाटले नाही की हा अभिषेक बच्चन आहे. एकंदरीत असं वाटलं की हे पात्र असंच आहे. आजच्या युगात असं काही पाहणं ही एक अनोखी गोष्ट आहे. ते स्वीकारणं आणि इतक्या समर्थपणे साकार करणं, यासाठी ज्या कलाकौशल्याची गरज असते, ती गुणवत्ता अभिषेक तू संपूर्ण जगाला दाखवून दिली आहेस".

पुढे त्यांनी लिहलं, "माझ्याकडून मनःपूर्वक शुभाशीर्वाद आणि प्रेमाचा वर्षाव. हो हो हो! तू माझा मुलगा आहेस आणि तुझी प्रशंसा करण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही. आणि वर्ष अजून संपलेलं नाहीये… कुणास ठाऊक, अजून काय काय पाहायला मिळेल तुझ्याकडून, या शब्दात त्यांनी अभिषेक बच्चनंच कौतुक केलंय.

हे चित्रपट तुम्ही कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता?अभिषेक बच्चनचा 'आय वॉन्ट टू टॉक' हा चित्रपट अमेझॉन प्राइम व्हिडीओवर स्ट्रीम झाला आहे. या चित्रपटाला आयएमडीबीवर ७.१ रेटिंग मिळाले आहे. तर 'हाऊसफुल ५' चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरून १८३ कोटी रुपये कमावलेत. लवकरच तो ओटीटीवर येणार आहे. अभिषेकचा तिसरा चित्रपट 'कालिधर लापता' हा चित्रपट ४ जुलै २०२५ रोजी ZEE5 वर प्रदर्शित झाला असून पहिल्याच दिवसापासून ट्रेंडिंग लिस्टमध्ये आहे. सध्या तो देशभरात टॉप १० ओटीटी चित्रपटांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. IMDb वर याला १० पैकी ८.३ रेटिंग मिळालं आहे. 

टॅग्स :अमिताभ बच्चनअभिषेक बच्चन