Join us

तुझ्यावर लोकं हसतील, पण...! अभिषेक बच्चनच्या टीकाकारांचे BIG B नी टोचले कान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 16:06 IST

अभिषेक बच्चनला 'दसवीं' चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळताच बिग बींनी ट्विट करत अभिषेकला ट्रोल करणाऱ्यांची बोलती बंद केली आहे.

फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्सची घोषणा २१ डिसेंबर रोजी करण्यात आली. या पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूड-टीव्हीचे अनेक बडे स्टार्स उपस्थित होते. अनेक कलाकारांना त्यांच्या दमदार परफॉर्मेन्ससाठी अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलं. या यादीत अभिषेक बच्चनच्या 'दसवी' चित्रपटाचाही समावेश आहे. 'दसवी'ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर अभिषेक बच्चनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला आहे. ज्युनियर बच्चनच्या आयुष्यातील हा सर्वात आनंदाचा क्षण होता.  बिग बींनी ट्विट करून अभिषेकचे अभिनंदन केले.

अभिषेक बच्चनला 'दसवीं'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. ज्युनियर बच्चनच्या कामगिरीवर अमिताभ बच्चनदेखील खूप आनंदी होते. अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत अभिषेकचं कौतुक केलं. ट्विट करत त्यांनी    लिहिलं, 'सर्वात योग्य पुरस्कार... शाब्बास भैयू... तू सर्वोत्कृष्ट होतास आणि नेहमीच राहशील. तू प्रामाणिक पणं स्वतःला सिद्ध केले आहे. ते पुढेही सुरु ठेव. तुझ्यावर लोकं हसतील, पण तुला ते दुर्लक्षित करू शकत नाहीत.

याशिवाय बिग बींनी अभिषेकसाठी आणखी एक ट्विट केलं आहे. ते लिहितात, 'माझा आनंद, माझा अभिमान. अखेर तू सिद्ध केले आहे. लोकांनी तुझी चेष्टा केली, पण तू संयमाने सर्वांची मनं जिंकली. तुम्ही सर्वोत्तम आहेस आणि नेहमीच राहशील. 

बिग बींनी यावेळी अभिषेकला ट्रोल करणाऱ्यांचं देखील कान टोचले आहेत. एक स्टार किड असूनही अभिषेकला  कलाविश्वात मोठा स्ट्रगल करावा लागला. विशेष म्हणजे उत्तम अभिनय केल्यानंतरही त्याच्या कामाचं कौतुक न झाल्याचं पाहायला मिळालं. पण टीकाकारांना त्याने नेहमी त्याच्या कामातून उत्तर दिलं. 

 

टॅग्स :अभिषेक बच्चनअमिताभ बच्चनसेलिब्रिटी