Join us

ईराणी डान्सरवर अमिताभ बच्चन यांचं जडलं होतं प्रेम, रेखा यांच्यावर देखील उचलला होता हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2019 15:11 IST

अमिताभ बच्चन यांचे बरेच लोकप्रिय किस्से आहेत. त्यातील त्यांचा एक गाजलेला किस्सा म्हणजे ईराणी डान्सरमुळे अमिताभ बच्चन यांनी अभिनेत्री रेखा यांच्यावर हात उचलला होता.

बॉलिवूडचे सुपरस्टार अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या जीवनाती चर्चा रेखा यांच्या अफेयरशिवाय अपूर्ण आहे. अमिताभ बच्चनरेखा यांचे अफेयर बॉलिवूडमधील सर्वात चर्चित अफेयरपैकी एक आहे.  ऐंशीच्या दशकाच्या सुरूवातीला रेखा व अमिताभ बच्चन वेगळे झाले होते. ते एकमेकांच्या समोर येणेदेखील टाळायचे. त्या दोघांचे बरेच किस्से आहेत. लहरें रेट्रोच्या नुसार, अमिताभ बच्चन यांनी एका ईराणी डान्सरमुळे रेखा यांच्यावर हात उचलला होता. 

 लावारिस चित्रपटाच्या शूटिंगवेळी अमिताभ बच्चन यांचे ईराणी डान्सरवर प्रेम जडले होते. त्यांच्या अफेयरची चर्चा मीडियामध्ये खूप रंगली होती. त्यामुळे त्यावेळी रेखा खूप वैतागल्या होत्या.

एकदिवस रेखा लावारिस चित्रपटाच्या सेटवर पोहचल्या होत्या. त्यांनी अमिताभ बच्चन यांना याबद्दल खुलासा करायला सांगितला. बिग बी खूप नाराज झाले होते आणि त्यांनी रेखा यांच्यावर हात उचलला आणि त्यांच्या कानशीलात मारल्याचं वृत्त आलं होतं.  

टाईम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांच्या जवळचे व्यक्ती अमरसिंग यांनी सांगितले होते की एकदा शबाना आझनी यांनी मला, अमिताभ आणि जया यांना बर्थडे पार्टीला बोलवले होते. आम्ही तिघं एकाच कारमधून त्यांच्या घरी गेलो होतो.

अमर सिंग यांच्यानुसार, रेखा यांना पाहून अमिताभ बच्चन माघारी फिरत गाडीकडे गेले. पण, त्यावेळी ड्राइव्हर जेवण करण्यासाठी निघून गेला होता. त्यामुळे अमिताभ बच्चन यांनी टॅक्सी पकडून घरी परतले होते.

त्यांनी शबाना आझमी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या नाहीत.

टॅग्स :अमिताभ बच्चनरेखा