Kajrare Song : साल २००५ मध्ये प्रदर्शित झालेला बंटी और बबली हा चित्रपट चांगलाच गाजला होता. त्यामध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan),राणी मुखर्जी अशा तगड्या कलाकरांची फळी पाहायला मिळाली. या चित्रपटचं कथानक, कलाकारांचा अभिनय आणि गाणी देखील सुपरहिट ठरली. परंतु, चित्रपटातील 'कजरा रे' हे गाणं विशेष गाजलं. या गाण्याची क्रेझ प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळते. परंतु सुरुवातील 'बिग बीं'नी या गाण्याच्या शूटिंगसाठी नकार दिला होता. याबद्दल दिग्दर्शक शाद अली यांनी खुलासा केला आहे.
बंटी और बबली सिनेमाचे दिग्दर्शक शाद अली यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये खास किस्सा शेअर केला. त्यादरम्यान ते म्हणाले, "मी जेव्हा 'कजरा रे' गाणं पहिल्यांदा ऐकलं तेव्हाच वाटलं की हे गाणं सुपरहिट होणार आहे. परंतु यश-राज यांच्या ते पसंतीस उतरलं नाही. हे गाणं जास्त चालणार नाही, असं त्याचं म्हणणं होतं. अमितजींनी तर सांगितलं की या गाण्याचं शूट करु नका. "
त्यानंतर शाद अली यांनी सांगितलं, "माझी अशी इच्छा होती की ते गाणं अमिताभ बच्चन यांच्या आवाजात रेकॉर्ड झालं पाहिजे. पण, त्यांनी नकार दिला हे गाणं ते शंकर महादेवन यांचा आवाजात रेकॉर्डिंग करावं असं ते म्हणत होते." परंतु गाणं हिट झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी मला फोन केला आणि ते म्हणाले, "मला माफ करा, मी गाण्यावर शंका उपस्ठित केली." असा खुलासा त्यांनी केला.