Join us

हॉस्पिटलमध्येही सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहेत बिग बी, त्यांचे हे ट्वीट होतय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 14:51 IST

अमिताभ यांनी 14 तासांपूर्वी शेवटचे ट्वीट केले आहे.

अमिताभ बच्चन गेल्या तीन दिवसांपासून नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. यकृताच्या आजारामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आजतकच्या रिपोर्टनुसार रविवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल. सोशल मीडियावरुन त्यांचे फॅन्स अमिताभ यांची प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना करतायेत. हॉस्पिटलमध्ये सुद्धा बिग बी सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहेत. त्यांचे ट्वीट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतायेत.  

अमिताभ यांनी 14 तासांपूर्वी शेवटचे ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांच्यासोबत जया बच्चनसुद्धा दिसतायेत. त्यांनी  जया बच्चन यांना करवा चौथच्या शुभेच्छा दिल्या आहेत.   

अमिताभ यांच्या तब्येतीबाबत बच्चन कुटुंबीय याबाबत लवकरच माहिती देतील. मात्र मेडिकल बुलेटिन काढण्यास बच्चन कुटुंबाने  हरकत घेतली आहे. बिग बींना  १९८२ मध्ये कुलीच्या शूटिंग दरम्यान त्यांना दुखापत झाली होती.  त्यादरम्यान त्यांची दोन ऑपरेशन झाली होती. मुंबई झालेले ऑपरेशन तर जवळजवळ आठ तास सुरू होते. हे ऑपरेशन यशस्वी झाले आणि त्यानंतर महिनाभराने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. 

 वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर अमिताभ यांच्याकडे खूप सारे प्रोजेक्ट आहेत. गुलाबो-सिताबो, ब्रह्मास्त्र, झुंड सारख्या अनेक सिनेमांमध्ये दिसणार आहे.  झुंड सिनेमाच्या माध्यमातून अमिताभ बच्चन पहिल्यांचा दिग्दर्शक नागराज मंजुळेसोबत काम करणार आहे. तर ब्रह्मास्त्रमध्ये आलिया, रणबीर आणि मौनी यांच्या ही मुख्य भूमिका आहेत. 

टॅग्स :अमिताभ बच्चन