Join us
Daily Top 2Weekly Top 5

आराध्या, अगस्त्य, नव्यासोबतच बिग बींना आहे आणखी एक नातू, 'त्या' फोटोतील चिमुकला कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 12:51 IST

अमिताभ बच्चन यांनी पहिल्यांदाच आपल्या सर्वात छोट्या नातवाचा फोटो शेअर केला आहे.

बॉलिवूडमध्ये बच्चन कुटुंबाचं मोठं नाव आहे. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना आराध्या, अगस्त्य, नव्या ही नातवंडे आहेत. मात्र नुकताच त्यांनी अभिषेकसोबत एका चिमुकल्याचा गोड फोटो शेअर केला. त्या फोटोवरुन हा चिमुकला नक्की आहे तरी कोण अशा चर्चा सुरु झाल्या. आराध्या, नव्या आणि अगस्त्य शिवायही बिग बींना आणखी एक नातू आहे. तो कोण माहितीये का?

अमिताभ बच्चन यांनी पहिल्यांदाच आपल्या सर्वात छोट्या नातवाचा फोटो शेअर केला आहे. मामा अभिषेक बच्चनचा हात धरुन हा चिमुकला घराखाली आला आहे. तर अमिताभ बच्चन गेटजवळ उभे राहून बाहेर जमलेल्या चाहत्यांना अभिवादन करत आहेत. बिग बींची एक झलक बघण्यासाठी दर रविवारी त्यांच्या बंगल्याबाहेर गर्दी जमते. ही गर्दी बघण्यासाठी तो चिमुकलाही मामासोबत आला आहे. या फोटोत सर्वांचंच लक्ष आपसूकच त्या चिमुकल्याकडे गेलं आहे.  अमिताभ यांनी शेअर केलेल्या फोटोला हिंदीतील चार ओळी लिहित सर्वांचंच मन जिंकलं आहे.

हा चिमुकला म्हणजे अमिताभ बच्चन यांचे भाऊ अजिताभ यांचा नातू आहे. अजिताभ यांची मुलगी नैना आणि अभिनेता कुणाल कपूर यांचा तो मुलगा आहे. २०१५ साली नैनाने अभिनेता कुणालशी लग्न केले. गेल्यावर्षीच त्यांनी मुलाला जन्म दिला. अजिताभ बच्चन हे अमिताभ यांचे छोटे भाऊ आहेत. ते लंडनमध्ये उद्योजक असून कुटुंबासोबत तिथेच स्थायिक आहेत. 

टॅग्स :अमिताभ बच्चनअभिषेक बच्चननव्या नवेलीकुणाल कपूर