Join us

अमिताभ बच्चन यांनी या सिनेमात गायली अंगाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 18:55 IST

अमिताभ बच्चन यांचा आगामी बहुचर्चित चित्रपट ठग्स ऑफ हिंदोस्तान लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा आगामी बहुचर्चित चित्रपट ठग्स ऑफ हिंदोस्तान लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या सिनेमात अमिताभ बच्चन यांनी एक अंगाई गीत गायले आहे. 

या अंगाई गीताबद्दल अमिताभ बच्चन म्हणाले की,  या गाण्यासाठी मी खूप उत्साही होतो. या चित्रपटातील खुदाबक्श आणि जाफिरा यांच्यातील नाते दर्शवणारे हे गीत आहे.  हे अंगाई गीत गाण्यासाठी मी खूप उत्साहित होतो. कारण अशा प्रकारच्या संधी नेहमी मिळत नाहीत.'' हे अंगाई गीत अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केले आहे आणि याचे लेखन अमिताभ भट्टाचार्य यांनी केले आहे. ठग्स आॅफ हिंदोस्तान हा चित्रपट विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित करत असून आमिर, अमिताभ यांच्यासोबतच या चित्रपटात सना शेख आणि कतरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटाच्या निर्मितीत कोणतीही कसर शिल्लक राहू नये याची काळजी घेतली आहे.  या सिनेमाच्या आऊटडोअर चित्रीकरणासाठी निर्मात्यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला असल्याची चर्चा आहे. या सिनेमाच्या काही दृश्यांचे चित्रीकरण माल्टा येथे करण्यात आले होते. ठग्स ऑफ हिंदोस्तान' हा चित्रपट फिलिप मेडोस टेलर यांच्या ‘कन्फेशन्स ऑफ अ ठग अँड द कल्ट ऑफ द ठगी’ या कादंबरीवर आधारित आहे. 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' हा चित्रपट ८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलुगु भाषेतदेखील प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :ठग्स आॅफ हिंदोस्तानअमिताभ बच्चन