Join us
Daily Top 2Weekly Top 5

अमिताभ बच्चन यांनी या व्यक्तीला दिलं सरप्राइज, गेल्या ४७ वर्षांपासून आहे एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 13:02 IST

अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यात या व्यक्तीला आहे महत्त्वाचं स्थान, जाणून घ्या याबद्दल

बॉलिवूडचे सुपरस्टार अभिनेते अमिताभ बच्चन अभिनयाव्यतिरिक्त माणुसकीनं चाहत्यांचे मन जिंकले आहे. पुन्हा एकदा त्यांच्या माणुसकीचं दर्शन घडलं आहे. नुकतेच अमिताभ बच्चन यांनी त्यांचे मेकअप आर्टीस्ट दीपक सावंत यांच्या सलूनशी निगडीत एका कार्यक्रमात हजेरी लावून त्यांना अचंबित केले. दीपक सावंत जवळपास पाच दशकांपासून अमिताभ बच्चन यांचा मेकअप करत आहेत. त्यांनी सलूनला ४० वर्षे झाल्याच्या निमित्ताने एक कार्यक्रम ठेवला होता. मात्र कोणालाच अमिताभ बच्चन या कार्यक्रमाला हजेरी लावतील अशी अपेक्षादेखील नव्हती.

अमिताभ बच्चन यांना सलूनमध्ये पाहून दीपक सावंत अवाक झाले. त्यांनी त्यांचा आनंद जाहीर करताना म्हटलं की, मी जेव्हा बच्चन साहेबांना कार्यक्रमांमध्ये येताना पाहिलं आणि मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसला नव्हता. एकाच वेळी मी आश्चर्य व सदम्यात होतो. त्यांनी मला आयुष्यभरासाठी हे गिफ्ट दिले आहे. मी व माझे कुटुंब हा क्षण कधीच विसरू शकत नाही. आम्ही यापेक्षा जास्त कोणत्याच गोष्टीची प्रार्थना करू शकत नव्हतो. आम्ही बच्चन साहेब व त्यांच्या कुटुंबाचे आभार मानतो. त्यांनी नेहमीच आम्हाला एका कुटुंबासारखे मानले आहे. त्यांच्यामुळे आज मी यशस्वी आहे.

अमिताभ बच्चन यांनी ट्विटच्या माध्यमातून त्यांच्या मेकअप आर्टिस्टचा परिचय करून दिला. जो त्यांच्या जीवनातील महत्त्वाचा व्यक्ती आहे. त्यांनी ट्विट केले की, दीपक ४७ वर्षांपासून माझा मेकअप आर्टिस्ट आहे. त्यांच्या कमाईतून त्यांनी मराठी व भोजपुरी चित्रपट बनविले. स्वतःच्या पत्नीसाठी छोटेसे पार्लर सुरू केले आहे. आज या पार्लरला ४० वर्षे पूर्ण झाली आहेत. तीन स्टोरी बिल्डिंगमध्ये ४०हून जास्त कर्मचारी आहे. मात्र त्यांनी माझ्या मेकअपच्या कामातून कधीच सुट्टी घेतली नाही.

अमिताभ बच्चन यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर झुंड, चेहरे, गुलाबो सिताबो आणि ब्रह्मास्त्र चित्रपटात झळकणार आहेत.

टॅग्स :अमिताभ बच्चनदीपक सावंत