Join us
Daily Top 2Weekly Top 5

अमिताभ बच्चन यांनी शत्रुघ्न सिन्हांना केली होती जबर मारहाण, शशी कपूर यांनी भांडण सोडवण्यासाठी केली होती मध्यस्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 15:18 IST

बॉलिवू़ड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी आपल्या बायोग्राफीमध्ये अमिताभ बच्चन यांनी जबर मारहाण केली त्याचा उल्लेख केला आहे.

बॉलिवू़ड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी आपल्या बायोग्राफीमध्ये अमिताभ बच्चन यांनी जबर मारहाण केली त्याचा उल्लेख केला आहे.  शत्रुघ्न सिन्हाअमिताभ बच्चन यांनी एकत्र बऱ्याच चित्रपटात काम केले आहे. ते दोघे एकेकाळी खूप चांगले मित्र होते. शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांची बायोग्राफी एनीथिंग बट् खामोशमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे.

अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी बायोग्राफीमध्ये सांगितले आहे की, काला पत्थर चित्रपटाच्या शूटिंगवेळी अमिताभ बच्चन यांनी त्यांना जबर मारहाण केली होती. जोपर्यंत शशी कपूर वाचवायला आले नाहीत तोपर्यंत अमिताभ बच्चन यांनी शत्रुघ्न सिन्हा यांना मारले होते. खरेतर हा एक सीन होता. मात्र याबद्दल शत्रुघ्न सिन्हा यांना काहीच माहित नव्हते. 

८०च्या दशकात अमिताभ बच्चन व शत्रुघ्न सिन्हा यांनी कित्येक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. मात्र या दोघांमधील नातेसंबंध बिघडत गेले. बायोग्राफीत त्यांनी लिहिले आहे की, काला पत्थरच्या सेटवर त्यांना अमिताभ बच्चन यांच्या बाजूची खुर्ची कधीच दिली नाही. तसेच अमिताभ बच्चन यांची छत्री देण्यात आली नाही. लोकेशनपासून अमिताभ बच्चन व ते एकाच हॉटेलमध्ये जायचे. पण अमिताभ बच्चन एकटेच आपल्या गाडीत बसून हॉटेलमध्ये जायचे. अमिताभ बच्चन यांनी कधीच त्यांना गाडीतून चलायला सांगितले नाही.

टॅग्स :शत्रुघ्न सिन्हाअमिताभ बच्चनशशी कपूर