Join us

‘एंग्जायटी’शी लढतेय अमिताभ यांची नात नव्या नवेली नंदा, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 16:38 IST

नव्याने ‘आरा हेल्थ’ नावाची संस्था सुरु केली. तिची ही संस्था मेंटल हेल्थ व संबंधित समस्यांप्रति जनजागृती करण्याचे काम करते.

ठळक मुद्देनव्या ही अमिताभ यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा हिची मुलगी आहे. नव्या अतिशय स्टाईलिश आहे.

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली या ना त्या कारणाने चर्चेत असतेच. ग्रॅज्युएट होताच नव्या बिझनेसवुमन बनली आहे. अलीकडे तिने ‘आरा हेल्थ’ नावाची संस्था सुरु केली. तिची ही संस्था मेंटल हेल्थ व संबंधित समस्यांप्रति जनजागृती करण्याचे काम करते. याच पार्श्वभूमीवर नव्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यात नव्या तिच्या चिंता विकारावर (एंग्जायटी) बोलतेय. या विकाराशी लढण्यासोबतच त्याच्यावरच्या उपचारांबद्दलचा अनुभव नव्याने यामाध्यमातून शेअर केला आहे.

एंग्जायटीबद्दल मी बोलण्यास आधी मी घाबरत होते. यावर मी उपचार घेतेय. आधी याबद्दल बोलायलाही मी कम्फर्टेबल नव्हते. हे माझ्यासाठी खूप नवीन होते. यावर बोलण्याआधी मी याचा अनुभव घेऊ इच्छित होते. मी उपचार घेत होते हे माझ्या कुटुंबाला  माहिती होते. मात्र माझ्या एकाही मित्राला याबद्दल ठाऊक नव्हते.   एकक्षण यावर बोलणे गरजेचे आहे, असे मला वाटू लागले. कारण आता सगळे काही नियंत्रणात आहे. मी कोणासोबतही यावर बोलू शकते. या आजाराबद्दलचा माझा अनुभव शेअर करू शकते. माझ्या मते आपल्याला मदतीची गरज आहे, हे लोकांना फार उशीरा कळते.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा कुण्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. नव्याचे फोटो सतत सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

नव्या ही अमिताभ यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा हिची मुलगी आहे. नव्या अतिशय स्टाईलिश आहे. त्यामुळेच येत्या काळात ती बॉलिवूडमध्ये दिसली तर नवल वाटायला नको. सोशल मीडियावर नव्या बरीच अ?ॅक्टिव्ह आहे. आपल्या मित्रांसोबत अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

टॅग्स :नव्या नवेली