Join us

म्हणे, ऐश्वर्या कहां है रे बुढे?  ‘टिवटिव’ करणा-याला अमिताभ बच्चन यांनी असे दिले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 13:31 IST

अन् अमिताभ यांचा पारा चढला...

ठळक मुद्देअमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहेत. कधी कविता, कधी जुने फोटो, कधी विनोद असे ते शेअर करत असतात. 

सोशल मीडियावर ट्रोल होणे बॉलिवूडकरांसाठी नवे नाही. अनेक स्टार्स ट्रोल होतात़ काही स्टार्स ट्रोल करणा-यांना सणसणीत उत्तर देऊन त्यांची बोलती बंद करतात तर काही जण याकडे दुर्लक्ष करणे पसंत करतात. अमिताभ बच्चन मात्र या दोन्हींमध्ये मोडतात. होय, ऐरवी ट्रोल करणा-यांना ते अजिबात भीक घालत नाही. पण वेळ आलीच तर त्यांना असे काही फैलावर घेतात की, सगळे मूग गिळून गप्प बसतात. अलीकडे असेच काही झाले.होय, अमिताभ यांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या सर्व चाहत्यांना ‘बैसाखी’च्या शुभेच्छा दिल्यात. या शुभेच्छा देताना त्यांनी आपल्या ‘सुहाग’ या चित्रपटातील ‘तेरी रब ने बना दी जोडी’ या गाण्याचा एक फोटो शेअर केला. यात अमिताभ भांगडा करताना दिसत आहेत. पण याचदरम्यान एक ट्रोलर त्यांना ट्रोल करू लागला. या ट्रोलरने अमिताभ यांना नाही तर त्यांची सून ऐश्वर्या राय बच्चन हिला ट्रोल केले.

अक्षय शर्मा नावाच्या या ट्रोलरने अमिताभ यांना असा काही प्रश्न केला की, अमिताभ यांचा पारा चढला. ‘ऐश्वर्या कहां है रे बुढे,’असे या ट्रोलरने लिहिले. अमिताभ खरे तर अशा ट्रोलरकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. पण यावेळी त्यांना कदाचित राहावले नाही. त्यांनी त्याला उत्तर देणे योग्य समजले. ‘वो वहां है, जहां आप कभी पहुँच नहीं पाएँगे... बाप रे बाप,’ असे उत्तर अमिताभ यांनी दिले.

अमिताभ यांचे हे उत्तर ऐकून ट्रोलर समजायचे ते समजला. मग काय, तो लगेच लाइनवर आला. मग काय? ‘आप तो बुरा मान गए सर, इतना भी कोई नाराज होता है क्या चाहने वालों से...,’ असे त्याने लिहिले.अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहेत. कधी कविता, कधी जुने फोटो, कधी विनोद असे ते शेअर करत असतात. 

टॅग्स :अमिताभ बच्चनऐश्वर्या राय बच्चन