Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहरुख खान, सलमान खानला मागे टाकत 'या' गोष्टीत अग्रेसर ठरले अमिताभ बच्चन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 08:00 IST

महानायक अमिताभ बच्चन, 2017-2018 मध्ये ट्विटरवर सर्वाधिक चर्चेत असलेले लोकप्रिय आणि ट्रेंडिग बॉलिवूड स्टार बनलेत.

ठळक मुद्देलवकरच त्यांचा ठग्स ऑफ हिंदोस्तान सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

महानायक अमिताभ बच्चन, 2017-2018 मध्ये ट्विटरवर सर्वाधिक चर्चेत असलेले लोकप्रिय आणि ट्रेंडिग बॉलीवूड स्टार बनलेत. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अनुसार, सप्टेंबर 2017 ते सप्टेंबर 2018 मध्ये बाकी बॉलीवूड ताऱ्यांपेक्षा शहनशाह अमिताभ बच्चन ह्यांचीच लोकप्रियता जास्त दिसून आलीय.  

स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या वार्षिक चार्टच्यानुसार, गेल्या 52 आठवड्यांमध्ये ट्विटरवर लोकप्रियतेत अमिताभ बच्चन पहिल्या स्थानी तर, किंग खान शाहरूख दूस-या क्रमांकावर, सलमान खान तिस-या, अक्षय कुमार चौथ्या आणि ऋतिक रोशन लोकप्रियतेत पाचव्या पदावर होते.

अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे. स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल सांगतात, "ट्विटरवर महानायक अमिताभ बच्चन ह्यांना मोठा चाहतावर्ग लाभला आहे. एवढी लोकप्रियता इतर कोणत्याही भारतीय अभिनेत्याला मिळालेली नाही. बिग बी खरोखरच फक्त अभिनयातच नाही तर लोकप्रियतेतही बाकी अभिनेत्यांपेक्षा सवाई आहेत."

अश्वनी कौल म्हणतात, “14 भारतीय भाषांमधल्या 500हून अधिक न्यूज वेबसाइटमध्ये बॉलीवूड सेलिब्रिटीच्याविषयी लिहीलेल्या बातम्यांच्या अनूसार तारे-तारकांची लोकप्रियता समजते. गेल्या काही दिवसांमध्ये डिजीटल दुनियेत अनुष्काच्या मुलाखती, विडीयो, आर्टिकल आणि न्यूजच सर्वाधिक दिसत होती. “

लवकरच त्यांचा ठग्स ऑफ हिंदोस्तान सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  ‘आझाद’च्या रूपात अमिताभ बच्चन यांचा जबरदस्त अ‍ॅक्शन अवतार दिसणार आहे. या सिनेमात महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह  आमिर खान, कॅटरिना कैफ, फातिमा सना शेख यांच्यादेखील मुख्य भूमिका आहेत. येत्या 9 नोव्हेंबरला या सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

टॅग्स :अमिताभ बच्चन