Join us
Daily Top 2Weekly Top 5

Amitabh Bachchan: सिक्युरिटी तोडून अमिताभ बच्चन यांच्या घरात घुसला चिमुकला, पाया पडला आणि मागितला ऑटोग्राफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 18:30 IST

लहानपासून ते मोठ्या पर्यंत प्रत्येकजण बिग बींचा चाहता आहे. 'भूतनाथ' सारख्या चित्रपटामुळे लहान मुलांमध्येही ते खूप लोकप्रिय झाले आहेत.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा चाहता वर्ग प्रत्येक वयोगटातला आहे. लहानपासून ते मोठ्या पर्यंत प्रत्येकजण त्यांचा चाहता आहे. 'भूतनाथ' सारख्या चित्रपटामुळे लहान मुलांमध्येही ते खूप लोकप्रिय झाले आहेत. अमिताभ बच्चन यांना त्यांच्या चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळते. 

नुकतेच बिग बींसोबत असंच काहीसं घडलं, जेव्हा त्यांची भेट एका लहान मुलासोबत झाली. अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉग पोस्टमध्ये या चाहत्याचा उल्लेख केला आहे आणि म्हणाले चाहत्यांचं प्रेम पाहून त्यांच्यामध्ये विशेष काय आहे असा प्रश्न त्यांना पडतो.

अमिताभ बच्चन दर रविवारी चाहत्यांना त्यांच्या बंगल्याबाहेर भेटतात आणि त्यांची एक झलक पाहण्यासाठी बरेच लोक येथे येतात. अमिताभ बच्चन यांनी एक किस्सा सांगितला आहे, ज्यामध्ये एक चार वर्षांचा मुलगा सुरक्षा तोडतो आणि पळून येऊन त्यांच्या पायाला स्पर्श करतो. 

या घटनेचा संदर्भ देत अमिताभ बच्चन यांनी लिहिले, 'आणि हा ४ वर्षाचा मुलगा डॉन पाहिल्यानंतर थेट इंदूरहून मला भेटायला आला.  मला भेटण्याची त्याची इच्छा पूर्ण झाल्यावर तो रडला आणि माझ्या पाया पडला. जे मला अजिबात आवडत नाही. 

पुढे अमिताभ बच्चन यांनी लिहिले की, 'त्याने जे माझे पेंटिंग बनवले होते त्यावर माझा ऑटोग्राफ घेतला. त्याच्या वडिलांचे पत्र मला वाचून दाखवले. हितचिंतकांच्या भावना अशाही असतात.  हे बघून मी एकटा असताना अनेकदा विचार करायला लागतो की हे सगळं माझ्यासोबत का? कसे? कधी?

अमिताभ बच्चन यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेता 'ऊंचाई' हा चित्रपट रिलीज झाला सुरू असून,  लोकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत अनुपम खेर, नीना गुप्ता, बोमन इराणी हे कलाकारही आहेत.

टॅग्स :अमिताभ बच्चनसेलिब्रिटी