Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोनम कपूरवर असे भडकले अमिताभ बच्चन! वाचा काय आहे कारण!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2017 15:10 IST

बॉलिवूडची फॅशनिस्टा  सोनम कपूरचा वाढदिवस नुकताच साजरा झाला. या वाढदिवसानिमित्त सोनमवर शुभेच्छांचा चांगलाच वर्षाव झाला. पण एक व्यक्ती मात्र ...

बॉलिवूडची फॅशनिस्टा  सोनम कपूरचा वाढदिवस नुकताच साजरा झाला. या वाढदिवसानिमित्त सोनमवर शुभेच्छांचा चांगलाच वर्षाव झाला. पण एक व्यक्ती मात्र सोनमवर जाम चिडली. ही व्यक्ती म्हणजे, अमिताभ बच्चन. होय, वाढदिवसासारख्या आनंदाच्या क्षणी अमिताभ यांनी सोनमवर चिडावे, हे खरे तर कुणालाच पचणार नाही. पण अमिताभ नुसते चिडले नाहीत तर त्यांनी आपला राग सोशल मीडियावर बोलून दाखवला. केवळ इतकेच नाही तर यानंतर सोनमला त्यांची माफीही मागावी लागली. पण, थांबा...थांबा...प्रकरण तुम्ही समजतायं इतक, सीरिअस नक्कीच नाहीय.   नेमके काय झाले, ते आम्ही तुम्हाला सांगतो. तर त्याचे झाले असे की, सोनमच्या वाढदिसाला अमिताभ यांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा मॅसेज केला होता. पण सोनमने सगळ्यांच्या मॅसेजचे उत्तर दिले. पण अमिताभ यांच्या वाढदिवसाच्या मॅसेजला मात्र तिने काहीच उत्तर दिले नाही. अमिताभ यांनी मग सोनमला चांगलेच रागावले. अर्थात लाडाने हो! ‘प्रिय सोनम, मी अमिताभ बच्चन. वाढदिवसाच्या निमित्ताने तुला एक मेसेज केला होता. पण, तू काही त्याचे उत्तर दिले नाहीस’,असे ट्विट अमिताभ यांनी यानंतर केले. विशेष म्हणजे,  या ट्विटमध्ये रागीट चेहºयाचा एक इमोजीही त्यांनी वापरला.  अमिताभ यांच्या या ट्विटनंतर सोनमला लगेच आपली चूक उमगली. ‘अरे देवा! सर मला खरंच तुमचा मेसेज नाही मिळाला. मी नेहमीच तुम्हाला रिप्लाय देते. पण, तरीही खूप खूप धन्यावाद सर. मला अभिषेकचा मेसेज मिळाला, मी खरंच मनापासून तुमची माफी मागते’, असं ट्विट तिने केलं. आता सोनमच्या या माफीनंतर अमिताभ यांचा राग निवळला असेलच. असे आपण समजू.