Join us

​अमिताभ बच्चन यांनी नाकारले महारानी एलिझाबेथचे निमंत्रण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2017 13:02 IST

बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांना क्वीन एलिझाबेथ द्वितीय आणि प्रिन्स फिलीप यांनी बकिंगहम पॅलेसचे निमंत्रण मिळाले.  उभय देशातील सांस्कृतिक ...

बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांना क्वीन एलिझाबेथ द्वितीय आणि प्रिन्स फिलीप यांनी बकिंगहम पॅलेसचे निमंत्रण मिळाले.  उभय देशातील सांस्कृतिक संबंध अधिक बळकट करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बकिंगहम पॅलेसमध्ये होणाºया भारत ब्रिटीश सांस्कृतिक कार्यक्रमात बिग बींनी सहभागी व्हावे, असे ९० वर्षीय राणी एलिझाबेथ द्वितीय यांची इच्छा होती. पण अमिताभ यांनी हे निमंत्रण नाकारले आहे. धक्का बसला ना? खरे तर राणी एलिझाबेथ आणि बकिंगहम पॅलेसचे निमंत्रण मिळणे, मोठ्या गौरवाची बाब आहे.  अशास्थितीत इतक्या ग्रँड सोहळ्याला अमिताभ यांनी नकार देण्याचे कारण काय असेल? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. मीडिया रिपोर्टचे मानाल तर, काही पूर्व नियोजित कमिटमेंटमुळे अमिताभ या भव्य सोहळ्याला जाऊ शकणार नाहीयेत. त्यामुळे अमिताभ यांनी याबद्दल दिलगीरी व्यक्त केली आहे. अर्थात सोशल मिडीयावर अमिताभ यांनी याबद्दल कोणतीच माहिती अद्याप दिलेली नाही.ALSO RED : ​‘आँखे २’मध्ये अभिताभ साकारणार तरुण खलनायक!अमिताभ बच्चन का मागताहेत आरजीव्हीची क्षमा?सध्या अमिताभ बच्चन ‘सरकार3’मध्ये बिझी आहेत. याच्या ट्रेलर लॉन्चची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. लवकरच अमिताभ ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’च्या शूटींगला सुरुवात करणार आहेत. याचित्रपटात अमिताभ यांच्यासोबत आमिर खान झळकणार आहे. याशिवाय अमिताभ अयान मुखर्जीच्या ‘ड्रॅगन’मध्ये दिसणार आहेत. श्विाय गौरंग दोशीच्या ‘आंखे2’मध्ये ते दिसणार आहेत.अलीकडे अमिताभ यांनी त्यांची नात आराध्यासोबतचा एक अनुभव सोशल मीडियावर शेअर केला. आज नातीने मोठ्या प्रेमाने इटानियन रेस्टारंटमध्ये पिझ्झा खाण्याची इच्छा बोलून दाखवली, असे त्यांनी लिहिले. यापूर्वी अमिताभ यांनी आराध्यासाठी एक हृदयस्पर्शी कविता लिहिली होती.