Join us

​अमिताभ बच्चन ‘कूल’ तर ऋषी कपूर ‘ओल्ड स्कूल’! पाहा, ‘१०२ नॉट आऊट’चे नवे पोस्टर!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2018 13:28 IST

अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर ही जोडी २७ वर्षांनंतर पडद्यावर परतत आहे. ‘१०२ नॉट आऊट’ या चित्रपटात ही जोडी ...

अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर ही जोडी २७ वर्षांनंतर पडद्यावर परतत आहे. ‘१०२ नॉट आऊट’ या चित्रपटात ही जोडी एकत्र बघायला मिळणार आहे. आज या चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज झाले. हे पोस्टर चांगलेच मजेशीर आहे. अंड्याच्या टरफलात बसलेले ऋषी कपूर अमिताभ यांच्याकडे बघताहेत आणि अमिताभ त्यांना अशा स्थितीत बघून हसत आहेत, असे हे पोस्टर आहे. सगळ्यात मजेशीर आहे ती, या पोस्टरवरची टॅगलाईन. होय,‘बाप कूल, बेटा ओल्ड स्कूल...’असे अंड्यावर लिहिलेले आहे. येत्या ४ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणारा हा चित्रपट ‘ओह माय गॉड’ फेम दिग्दर्शक उमेश शुक्ला दिग्दर्शित करताहेत. चित्रपटाचे पोस्टर पाहता, अमिताभ व ऋषी कपूर ही जोडी या चित्रपटात किती धम्माल मस्ती करणार, याचा अंदाज बांधता येऊ शकतो.ALSO READ : ‘या’ फोटोमुळे अमिताभ बच्चन यांना मिळाला होता नकार!चित्रपटात अमिताभ यांचे वय १०२ वर्ष दाखविण्यात येणार असून, त्यांना पृथ्वीवरील सर्वांत वयोवृद्ध वक्तीचा रेकॉर्ड तोडायचा असतो, तर ऋषी कपूर त्यांच्या मुलाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या दोघांव्यतिरिक्त अभिनेते परेश रावल यांचीही चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी अभिनयाबरोबर एक गाणेही गायिले आहे.  अमिताभ-ऋषी यांची जोडी अखेरीस ‘अजुबा’ या चित्रपटात बघायवास मिळाली होती.   या चित्रपटातील भूमिकेसाठी अमिताभ यांना मेकअपसाठी तीन तास लागायचे. पुढे हे मेकअप उतरवण्यासाठी १ तास लागायचा. त्यामुळे या चित्रपटातील वयोवृद्ध पिता-पुत्राची जोडी पाहण्यास चाहते उत्सूक आहेत. चित्रपटाचा ट्रेलर आधीच रिलीज झालाय. यातील अमिताभ व ऋषीची केमिस्ट्री चांगलीच इंटरेस्टिंग आहे.