Join us
Daily Top 2Weekly Top 5

​महिलांची ‘ही’ गोष्ट करते अमिताभ बच्चन यांना आकर्षित!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2017 11:59 IST

अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपति’ या शोचे नववे सीझन अलीकडेच संपले. सध्या अमिताभ ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ या चित्रपटात ...

अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपति’ या शोचे नववे सीझन अलीकडेच संपले. सध्या अमिताभ ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ या चित्रपटात व्यस्त आहेत. पण इतक्या व्यस्ततेत अमिताभ यांनी एक खुलासा केला आहे. होय, महिलांची एक अशी गोष्ट जी अमिताभ यांना मोहित करते. याच गोष्टीचा खुलासा त्यांनी केला आहे. खरे तर जगाच्या पाठीवर असे कुठलेच ठिकाण नसावे, जिथे अमिताभ यांचे चाहते नाहीत. त्यांच्यावर भाळणाºयांमध्ये स्त्री-पुरूष, तरूण-तरूणी सगळ्यांचाच समावेश आहे. पण खुद्द अमिताभ यांच्याबद्दल विचाराल तर ते महिलांच्या केवळ एका गोष्टीवर भाळतात. महिलांची ही गोष्ट त्यांना कमालीची आकर्षित करते. ही गोष्ट कुठली तर महिलांचे दागिणे. होय, ‘महिलांची नानाविध आभुषणे पाहून मी मंत्रमुग्ध होतो. माझ्या नजरा त्यांच्या आभुषणांवर खिळतात. देशाच्या दक्षिणात्य संस्कृतीचा भाग असलेली आभुषणे माझे लक्ष वेधून घेतात. त्यातही ओडियानम (कमरपट्टा) मला सर्वाधिक आकर्षित करतो.ओडियानम महिला कमरेवर  बांधतात. मुलगी लग्न होऊन सासरी जाताना तिची आई तिला ओडियानम भेट देते. ही परंपरा एका पिढीकडून दुसºया पिढीकडे जाते, असे अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे.अलीकडे अमिताभ आणि जया बच्चन यांनी एका दागिण्यांच्या  जाहिरातीसाठी शूट केले. या शूटदरम्यानचा एक फोटोही बिग बी यांनी त्यांच्या सोशल अकाऊंटवर शेअर केला आहे. ‘एका जाहिरातीसाठी बायकोसोबत काम करत आहे. सावधान!! बायकोसोबत शूट’, असे कॅप्शन त्यांनी या फोटोला दिले आहे. या  फोटोत दोघांनीही सारख्याच रंगाचे कपडे घातले आहेत.गेल्या अनेक वर्षांपासून अमिताभ आणि जया हे एका ज्वेलरी ब्रॅण्डचे अ‍ॅम्बेसिडर आहेत. ALSO READ: मला कुठलीही प्रसिद्धी नकोय, शांती हवीय! अमिताभ बच्चन यांची मीडियाला विनंती!!सध्या अमिताभ यांच्याकडे ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ याशिवाश ‘पॅडमॅन’, ‘१०२ नॉट आऊट’ या सिनेमांमध्ये बिझी आहेत.याशिवाय लवकरच ते नागराज मंजुळे यांच्या आगामी सिनेमाच्या शूटींगला  सुरूवात करणार आहेत. या सिनेमात ते नागपूरात ‘स्लम सॉकर’ या स्वयंसेवी संस्थेची स्थापना करणारे विजय बार्से यांची भूमिका साकारताना दिसतील.