Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मी कचरा करणार नाही", मराठी बोलताना अमिताभ बच्चन यांच्याकडून मोठी चूक, मागितली माफी, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 12:40 IST

बिग बींनी त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत त्यांच्या चाहत्यांची जाहीर माफी मागितली आहे. चुकीचं मराठी बोलल्याने अमिताभ यांनी चाहत्यांची माफी मागत हा व्हिडिओ शेअर केला आहे.

बॉलिवूड महानायक बिग बी अमिताभ बच्चन गेली कित्येक दशकं प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहेत. कुली, शोले, डॉन, दीवार, सिलसिला, झंजीर अशा सुपरहिट सिनेमांनी त्यांनी ७०-८०चं दशक गाजवलं. अजूनही अमिताभ बच्चन यांची क्रेझ काही कमी झालेली नाही. आजही चाहते त्यांच्यावर तितकंच प्रेम करतात. बिग बी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतात. बॉलिवूडचा सुपरस्टार असूनही त्यांच्या स्वभावात नम्रपणा असल्याचं दिसून येतं. याचीच प्रचिती त्यांच्या एका व्हिडिओतून मिळाली आहे. 

बिग बींनी त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत त्यांच्या चाहत्यांची जाहीर माफी मागितली आहे. चुकीचं मराठी बोलल्याने अमिताभ यांनी चाहत्यांची माफी मागत हा व्हिडिओ शेअर केला आहे. काही दिवसांपूर्वी बिग बींनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये त्यांनी "मी कचरा करणार नाही" असं म्हणत चाहत्यांनाही कचरा न करण्याचं आवाहन केलं होतं. पण, हा व्हिडिओ करताना मराठी बोलण्यात बिग बींकडून मोठी चूक झाली होती. मित्राने सांगितल्यानंतर बिग बींच्या ही चूक लक्षात आली. त्यानंतर त्यांनी व्हिडिओ शेअर करत चुकीचं मराठी बोलल्याबद्दल माफी मागितली आहे. तसंच या व्हिडिओत त्यांनी त्यांची चूकही सुधारली आहे. 

"नमस्कार, मी अमिताभ बच्चन. काही दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ केला होता. मी कचरा करणार नाही, असं मी मराठीत म्हणालो होतो. पण, मराठी बोलताना मी कचरा या शब्दाचा चुकीचा उच्चार केला होता. माझे मित्र सुदेश भोसले यांनी माझी ही चूक लक्षात आणून दिली. त्यामुळे मी पुन्हा हा व्हिडिओ करत आहे. मी कचरा करणार नाही", असं बिग बींनी म्हटलं आहे. "एका व्हिडिओत उच्चार चुकला होता. त्यामुळे परत हा व्हिडिओ करत आहे. क्षमा असावी", असं कॅप्शन या व्हिडिओला त्यांनी दिलं आहे. 

बिग बी अमिताभ बच्चन यांचा हा व्हिडिओ पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. मराठी शब्दाचा उच्चार चुकल्यामुळे त्यांनी पु्न्हा व्हिडिओ करत आपली चूक कबुल करत ती सुधारल्यामुळे चाहत्यांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. 

टॅग्स :अमिताभ बच्चनसेलिब्रिटी