Join us
Daily Top 2Weekly Top 5

अमिताभ बच्चन यांच्या 'अँग्री यंग मॅन'चं 'कांतारा' कनेक्शन, रिषभ शेट्टीनं सांगितलं गुपीत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2022 11:38 IST

दिग्दर्शक आणि अभिनेता रिषभ शेट्टी याच्या 'कांतारा' चित्रपटाला अभूतपूर्व यश प्राप्त झालं आहे.

दिग्दर्शक आणि अभिनेता रिषभ शेट्टी याच्या 'कांतारा' चित्रपटाला अभूतपूर्व यश प्राप्त झालं आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापासूनच रिषभच्या अभिनय आणि दिग्दर्शन कौशल्याचं विविध स्तरांतून तोंडभरुन कौतुक केलं जात आहे. कन्नड सिनेइंडस्ट्री पलिकडे जात बॉलीवूडसह अगदी जगभरातही रिषभ शेट्टीच्या 'कांतारा'ला तिकीट खिडकीवर तुफान प्रतिसाद मिळाला. आता 'कांतारा' सिनेमाबाबत रिषभनं एक गुपीत उघड केलं आहे.

'कांतारा'तील रिषभ शेट्टीच्या भूमिकेमागे बॉलीवूडचे 'बिग बी' अमिताभ बच्चन यांचा मोलाचा हातभार असल्याचं खुद्द रिषभनं सांगितलं आहे. अमिताभ बच्चन यांच्या 'अँग्री यंग मॅन'च्या भूमिकेतूनच मला 'कांतारा'तील शिवा साकारण्यासाठी प्रेरणा मिळाली. अमिताभ यांची 'अँग्री यंग मॅन' इमेज आणि 'कांतारा'तील शिवा यांच्या बरंच साम्य आहे, असं रिषभ शेट्टी म्हणाला. 

"अमिताभजी ज्या पद्धतीनं पडद्यावर अँग्री यंग मॅन दिसले. नक्कीच शिवामध्येही तेच सारं काही आहे", असं रिषभ म्हणाला. 'पिंकविला'ला दिलेल्या मुलाखतीत रिषभनं अमिताभ बच्चन यांच्या भूमिकांमधून प्रेरणा मिळाल्याचं म्हटलं आहे.

'कांतारा' सिनेमाचं कौतुक अनेद दिग्गज मंडळींकडून केलं जात आहे. यात दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचाही समावेश आहे. रजनीकांत यांनी 'कांतारा' पाहिल्यानंतर रिषभ शेट्टीची भेट घेऊन त्याचं तोंडभरुन कौतुक केलं होतं. रजनीकांत यांच्यासोबतच्या भेटीचा फोटो पोस्ट करत रिषभनं आपल्या आयुष्यातील सुवर्णक्षण असल्याचं म्हटलं होतं. तसंच वेळात वेळ काढून भेट दिल्याबद्दल रिषभनं रजनीकांत यांचे आभारही मानले होते. 

टॅग्स :अमिताभ बच्चन