Join us

Happy Birthday : सिनेमात फ्लॉप असली तरी एखाद्या राजवाड्यासारखे आहे अमिषा पटेलचं आलिशान घर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 13:56 IST

तिचे घरं खूप मोठे आणि आलिशान आहे.

२००० मध्ये ‘कहो ना प्यार है’ सारखा सुपरडुपर हिट सिनेमा देणारी अभिनेत्री अमिषा पटेलने पहिल्याच चित्रपटाने तरुणांना अक्षरश: वेड लावले होते. या सिनेमाने अभिनेता हृतिक रोशनला एका रात्रीत स्टार बनवले, तर अमिषा पटेललासुद्धा बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख प्राप्त करुन दिली. पुढच्याच वर्षी ‘गदर एक प्रेमकथा’ हा तिचा दुसरा सिनेमा रिलीज झाला.

हा सिनेमाही सुपरडूपर हिट ठरला. या सिनेमातील चुलबुली शकीनाच्या भूमिकेमुळे अमिषाच्या लोकप्रियतेत वाढ झाली होती. मात्र या सिनेमानंतर आमिषाला फारसे यश मिळाले नाही.

अमिषाच्या बॉलिवूड प्रवासासोबत आम्ही तुम्हाला तिच्या घराचे फोटो दाखवणार आहोत. अमिषा मुंबईतल्या एक पॉश परिरसरात राहते. अमिषा घरातले फोटो सोशल मीडियावर नेहमीचे शेअर करत असते. अमिषा एका पेंट हॉऊसमध्ये राहते. तिचे घरं खूूप मोठे आणि आलिशान आहे. 

तिच्या घरात खूप सुंदर जिने आहेत. जिन्याला लागून असलेल्या भिंती अमिषाच्या सुंदर फोटो आणि चित्रांनी सजवलेली आहे. ही अमिषाची घरातील सगळ्यात आवडती जागा आहे असे दिसते. कारण रोज ती या जिन्यावर बसून फोटो काढत असते.

अमिषाकडे जवळपास ३५ दशलक्ष डॉलरहून अधिक संपत्ती आहे. बिग बॉस आणि ‘तौबा तेरा जलवा’ हे चित्रपट सोडले तर अमिषा कोणत्या जाहिरातीमध्ये देखील झळकलेली नाहीये. पण असे असले तरी तिच्याकडे चांगलाच पैसा आहे.

टॅग्स :अमिषा पटेल