Join us
Daily Top 2Weekly Top 5

अमिषा पटेलने वन पीसमध्ये शेअर केला फोटो; यूजर्सनी म्हटले, ‘दीदी बच्चे डर जाएंगे’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 17:01 IST

अमिषा पटेलने पुन्हा एकदा सोशल मीडियावर तिचा एक फोटो शेअर केला असून, यूजर्सकडून त्यास उलट-सुलट प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल हिने वन पीस पार्टी वियरमध्ये एक फोटो तिच्या ट्विटर हॅण्डलवर शेअर केला. परंतु तिचा हा फोटो यूजर्सला फारसा पसंत आला नसल्याचे दिसत आहे. कारण अनेकांनी तिच्या या फोटोचा समाचार घेताना तिच्यावर खरपूस टीका केली आहे. मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरवर यूजर्सकडून अमिषाला चांगलेच ट्रोल केले जात आहे. मोकळे केस आत्रण लाल लिपस्टिकमध्ये दिसत असलेल्या अमिषाच्या या फोटोला कॉमेण्ट देताना एका यूसर्जने लिहिले की, ‘दीदी मुले घाबरत आहेत.’ एका अन्य यूजर्सने लिहिले की, ‘कहो ना प्यार हैं चा दुसरा पार्ट केव्हा येणार आहे.’ तर आणखी एका यूजर्सने लिहिले की, ‘ही मॅडम नेहमीच नशेत असते.’अशाप्रकारचे कित्येक ट्विट अमिषाच्या या फोटोला करण्यात आले आहेत. खरं तर पहिल्यांदाच अमिषाच्या फोटोला अशाप्रकारच्या टीकात्मक कॉमेण्ट केल्या जात आहेत असे नाही, तर यापूर्वीही तिच्या अनेक फोटोंचा यूजर्सकडून समाचार घेण्यात आला आहे. सनग्लासेज लावून शॉवर घेत असतानाच्या या फोटोला तर यूजर्सनी प्रचंड ट्रोल केले आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये अमिषाने लिहिले होते की, ‘शॉवर लाइक ए टॉकस्टार’ वास्तविक अमिषाला ‘शॉवर लाइक अ रॉकस्टार’ असे लिहायचे होते. परंतु यूजर्सनी याच मुद्द्यावरून तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर अमिषाने तिची ही चूक दुरुस्त केली. हा फोटो अमिषाच्या लेटेस्ट फोटोशूटमधील होता.  या फोटोच्या बºयाच काळानंतर अमिषाने हा फोटो शेअर केला. त्यासदेखील चाहत्यांकडून उलट-सुलट प्रतिक्रिया मिळत आहेत. दरम्यान, अमिषा गेल्या काही काळापासून बॉलिवूडमधून गायब आहे. मात्र अशातही अमिषा जेव्हा-जेव्हा सोशल मीडियावर स्टेट््स अपडेट करते तेव्हा-तेव्हा चाहते त्यास प्रतिसाद देतात. काही महिन्यांपूर्वीदेखील अमिषाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये तिचे क्लीवेज स्पष्टपणे दिसत होते. त्यावरूनदेखील यूजर्सनी उलट-सुलट कॉमेण्ट देत तिला धारेवर धरले होते.