Join us

आमिर म्हणतोय, सुलतान पीकेचा रेकॉर्ड मोडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2016 16:27 IST

आमिर खान आणि सलमान खान हे दोघे खूप चांगले मित्र आहेत. सलमानने आमिरच्या कुटुंबियांसाठी सुलतान या चित्रपटाचे खास स्क्रनिंग ...

आमिर खान आणि सलमान खान हे दोघे खूप चांगले मित्र आहेत. सलमानने आमिरच्या कुटुंबियांसाठी सुलतान या चित्रपटाचे खास स्क्रनिंग आयोजित केले होते. हा चित्रपट आमिरला खूप आवडल्याचे तो सांगतो. हा चित्रपट पाहिल्यावर लगेचच रात्री मेसेज करून सलमानचे मी कौतुक केले असेही तो सांगतो. आमिरने सलमानला मेसेज करून सुलतान हा खूप चांगला चित्रपट असून तो पीके या चित्रपटाचा रेकॉर्ड नक्कीच मोडेल असे सांगितले. या चित्रपटासाठी सलमानने खूप मेहनत घेतली असून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला पाहिजे असे आमिरला वाटते. आमिरने त्याच्या फेसबुक पेजवरही हा चित्रपट खूप चांगला असून अली अब्बासचे दिग्दर्शन खूप चांगले आहे. सलमान आणि अनुष्काने खूप चांगला अभिनय केला आहे. तुम्ही हा चित्रपट पाहायचे चुकवू नका असे त्याच्या फॅन्सना आवाहन केले आहे.