Join us

आमिर खान तरूण महावीर फोगाट यांच्या लुकमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2016 16:11 IST

आमीर खानचा आगामी सिनेमा 'दंगल'मधील नवीन लूक रिलीज झाला आहे. स्वत: आमीर खानने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन 'दंगल' सिनेमातील फोटो ...

आमीर खानचा आगामी सिनेमा 'दंगल'मधील नवीन लूक रिलीज झाला आहे. स्वत: आमीर खानने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन 'दंगल' सिनेमातील फोटो शेअर केला आहे. या सिनेमात आमीर खान सुप्रसिद्ध कुस्तीपटू महावीर फोगाट यांची भुमिका साकारत आहे.  कुस्तीपटू महावीर फोगाट यांच्या आयुष्यावर आधारित ‘दंगल’ सिनेमा डिसेंबरमध्ये ख्रिसमसच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. याधीच्या लुकमध्ये आमीर खान वयस्कर महावीर फोगाट यांच्या लुकमध्ये दिसतोय. तर नविन फोटो मध्ये आमीर खान महावीर फोगाट यांच्या तारूण्यातल्या लुकमध्ये पहायला मिळतोय.