बॉलिवूडचे सगळ्यात चर्चित जोडपे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लवकरच ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात दिसणार आहे. याच चित्रपटाच्या सेटवर रणबीर व आलिया एकमेकांच्या जवळ आलेत. त्यांच्यात प्रेम फुलले. सुरुवातीच्या काळात दोघांनीही हे प्रेम लपवण्याचा खटाटोप केला. पण शेवटी हे प्रेम जगासमोर आलेच. आता तर या दोघांच्या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब झाले आहे. ताजी चर्चा खरी मानाल तर बॉलिवूडचे हे हॉट कपल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. कदाचित याचमुळे आलिया व रणबीरने एक मोठा प्रोजेक्ट नाकारला आहे. होय, बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार, ‘ब्रह्मास्त्र’चे काम संपल्यानंतर कुठलाही नवा प्रोजेक्ट स्वीकारण्यास दोघांनी नकार दिला आहे.
रणबीर कपूर- आलिया भट्टला झाली ‘ब्रह्मास्त्र’ संपवण्याची घाई! नव्या प्रोजेक्टला दिला नकार!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2019 10:16 IST
चर्चा खरी मानाल तर रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. कदाचित याचमुळे आलिया व रणबीरने एक मोठा प्रोजेक्ट नाकारला आहे.
रणबीर कपूर- आलिया भट्टला झाली ‘ब्रह्मास्त्र’ संपवण्याची घाई! नव्या प्रोजेक्टला दिला नकार!!
ठळक मुद्देगेल्या काही दिवसांत रणबीर व आलियांतील कुरबुरींच्या बातम्यांनी लक्ष वेधले. अलीकडे ‘गली बॉय’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यानचा दोघांचाही एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.