Mouni Roy: 'देवों के देव', 'नागिन' या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मौनी रॉय.टीव्ही इंडस्ट्री गाजवल्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सध्याच्या घडीला ती हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.पण सध्या मौनी रॉय तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. मौनी रॉय आणि आणि तिचा पती सूरज नांबियार यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले आहे. तसेच अभिनेत्रीने तिच्या पतीसोबतची फोटोसुद्धा डिलीट केले आहेत, त्यामुळे त्यांच्या वैवाहिक आयुष्यात दुरावा आल्याच्या चर्चा सध्या सगळीकडे होत आहेत.
मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांनी २०२२ मध्ये लग्न केलं. अभिनेत्रीचा विवाह सोहळा गोव्यात मोठ्या दिमाखात पार पडला. मळ्याली आणि बंगाली पद्धतीने या दोघांनी लग्न केलं होतं. आता लग्नानंतर ४ वर्षानंतर त्यांच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आलं आहे. दरम्यान,घटस्फोटाच्या चर्चांवर मौनीने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.अशातच घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिनेत्रीने शेअर केलेल्या एका पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. ही पोस्ट तिने एका खास व्यक्तीच्या वाढदिवसानिमित्त शेअर केली आहे.
मौनी रॉयने 'या' खास व्यक्तीसाठी लिहिली पोस्ट
घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान, मौनी रॉयने इन्स्टाग्रामवर तिच्या बहिणीसोबतच काही फोटो शेअर केले. तिने आपल्या लाडक्या बहिणीच्या वाढदिवशी सुंदर अशी पोस्ट लिहून तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टमध्ये अभिनेत्रीने म्हटलंय," माझी बहीण, आयुष्यात काहीही झालं, अगदी कठीण प्रसंगातही ठाम असणारी.तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.... तुझी विनोदबुद्धी, तुझी हुशारी, तुझी प्रत्येक गोष्ट मला आवडते.माझं तुझ्यावर किती प्रेम आहे हे शब्दांत सांगता येणार नाही. आणि हे तुला आधीच माहीत आहे." असं म्हणत मौनीने बहिणीविषयी प्रेम व्यक्त केलं आहे. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Web Summary : Amid divorce rumors, Mouni Roy's Instagram post for her sister's birthday is gaining attention. The actress expressed love and admiration for her sister in the heartfelt message, which is now viral.
Web Summary : तलाक की अफवाहों के बीच, मौनी रॉय की अपनी बहन के जन्मदिन पर इंस्टाग्राम पोस्ट ध्यान आकर्षित कर रही है। अभिनेत्री ने हार्दिक संदेश में अपनी बहन के लिए प्यार और प्रशंसा व्यक्त की, जो अब वायरल हो रहा है।