Join us
Daily Top 2Weekly Top 5

अमिषा पटेलचा ‘हा’ फोटो बघून यांनी दिला पोर्नस्टार बनण्याचा सल्ला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2018 16:52 IST

अमिषा पटेलने तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून, त्यास तुफान कॉमेण्ट दिल्या जात आहेत. एका कॉमेण्टमध्ये तिला पोर्नस्टार बनण्याचा सल्ला दिला आहे.

‘कहो ना प्यार है’सारख्या सुपरहिट चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री अमिषा पटेल गेल्या काही वर्षांपासून मोठ्या पडद्यावरून गायब आहे. परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात आहे. आपले हॉट फोटो शेअर करून ती चर्चेत असते. आतादेखील तिने तिच्या सोशल अकाउंटवर असाच एक हॉट फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये अमिषाने खूपच रिवीलिंग ड्रेस परिधान केलेला आहे. त्यामुळे या फोटोवरून सध्या ती ट्रोल होत असून, यूजर्सकडून त्यास अतिशय अश्लील अशा स्वरूपाच्या कॉमेण्ट दिल्या जात आहेत. विशेष म्हणजे अनेकांनी तिला विचित्र स्वरूपाचे सल्लेही यावेळी दिले आहेत.  अनेक यूजर्सनी म्हटले की, आम्ही तिला तिच्या ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटामुळे अडमायर करीत होतो, परंतु आता आम्हाला लाज वाटत आहे. एका यूजर्सने तर तिला असा काही सल्ला दिला, ज्यामुळे तिचे चाहते चक्रावून गेले असतील. या यूजर्सने लिहिले की, ‘आता तिला पोर्नस्टार बनायला हवे.’ काहींनी तर अतिशय अश्लील स्वरूपाच्या कॉमेण्ट दिल्या आहेत. वास्तविक अमिषा सोशल मीडियावर नेहमीच तिचे बोल्ड फोटो शेअर करीत असते. त्यामुळे ती बºयाचदा यूजर्सकडून ट्रोल होत असते. यापूर्वीदेखील तिने असाच एक बोल्ड फोटो शेअर केला होता. ज्यामुळे ती यूजर्सच्या रडारवर आली होती.