Join us  

​चित्रपटांऐवजी ‘हे’ काम करतेयं अमिषा पटेल! पुन्हा झाली ट्रोल!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2017 10:10 AM

अभिनेत्री अमिषा पटेल हिच्याकडे बॉलिवूडमध्ये सध्या काहीही काम नाही. पण ती सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. बुधवारी तिने एक ...

अभिनेत्री अमिषा पटेल हिच्याकडे बॉलिवूडमध्ये सध्या काहीही काम नाही. पण ती सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. बुधवारी तिने एक हॉट फोटो पोस्ट केला. यात अमिषा स्वीमसूटमध्ये दिसतेय. काही लोकांना तिचा हा हॉट अवतार प्रचंड आवडला  तर काहींनी या हॉट फोटोवरून तिला ट्रोल केले. अर्थात अशा बोल्ड फोटोंमुळे ट्रोल होण्याची ही अमिषाची पहिली वेळ नाही. याआधीही एका फोटोवरून टोलर्सनी तिला नाही नाही ते ऐकवले होते.अमिषाला बॉलिवूडमध्ये काम नाही. चर्चा खरी मानाल तर अमिषाचा मॅनेजर सर्व प्रोड्यूसर्सकडे जावून अमिषासाठी काम मागत फिरतो आहे. अमिषा कुठलीही भूमिका करायला तयार आहे. मग ती ‘ऐ दिल है मुश्किल’मधील ऐश्वर्या राय बच्चनची भूमिका का असेना असे मॅनेजर प्रत्येक प्रोड्यूसरला सांगत आहे. पण इतके करूनही अद्याप तरी अमिषाला बॉलिवूडमध्ये मोठा चित्रपट मिळालेला नाही. मधल्या काळात अमिषाने साऊथचे काही चित्रपटही केलेत. पण तिकडेही तिला म्हणावे तसे यश मिळाले नाहीच.ALSO READ : अमिषा पटेलकडे असलेल्या ‘या’ बॅगची किंमत वाचून तुम्हाला धक्का बसेल!अमिषाने आपल्या लहानशा करिअरमध्ये फार कमी हिट दिलेत. पण वादांसोबत तिचे जुने नाते राहिले आहे. तुम्ही जाणताच की, ‘कहो ना प्यार है’ हा चित्रपट आधी करिना कपूरला आॅफर झाला होता. पण करिनाने मध्येच हा चित्रपट सोडला. यानंतर यात अमिषाची वर्णी लागली होती. ‘कहो ना प्यार है’ हिट होताच अमिषाने करिनावर कमेंट्स करणे सुरु केले होते. यानंतर अमिषाचे तिच्या पालकांशी मतभेद झाल्याची खबर आली होती. पालकांचे घर सोडून ती तिचा कथित बॉयफ्रेन्ड विक्रम भट्टच्या घरी शिफ्ट झाली होती व वडिलांवर तिने १२ कोटींचा दावा ठोकला होता. माझ्या पालकांनी मी कमावलेले पैसे उडवले, असा आरोप तिने केला होता. अलीकडे एका प्रेस कॉन्फरन्समध्ये तिचा तोरा दिसला होता. मला अमिषा नाही तर अमिषाजी म्हणून बोलवा, असे तिने पत्रकारांना बजावले होते. शिवाय शांत बसा, असे जोरात ओरडत तिने याठिकाणी असभ्य वर्तन केले होते.