Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मी तर क्रिकेट टीम जन्माला घातली असती...", ५०व्या वर्षीही अविवाहित असलेल्या अमीषा पटेलचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 14:07 IST

अमीषाला लहान मुलांची प्रचंड आवड आहे. त्यामुळेच अविवाहित असूनही अभिनेत्रीने काही अनाथ मुलांच्या पालकत्वाची जबाबदारी घेतली आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याबाबत तिने भाष्य केलं. 

'गदर' सिनेमामुळे रातोरात प्रसिद्ध झालेली आणि कायमच चर्चेत असलेली अमीषा पटेल ही बॉलिवूडमधली लोकप्रिय अभिनेत्री आहे. पण, ५०व्या वर्षीही अमीषा सिंगल आहे. तिने लग्न केलेलं नाही. पण अमीषाला लहान मुलांची प्रचंड आवड आहे. त्यामुळेच अविवाहित असूनही अभिनेत्रीने काही अनाथ मुलांच्या पालकत्वाची जबाबदारी घेतली आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याबाबत तिने भाष्य केलं. 

अमीषाने रणवीर अल्लाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यामध्ये ती म्हणाली, "मी माझे पुतणे, भाच्यांचे डायपर बदलायचे. त्यांना जेवू घालायचे...झोपवायचेदेखील. मी तेव्हा म्हणायचे की मी क्रिकेट टीम जन्माला घालेन. तेव्हा माझी आई मला म्हणायची की आधी एका बाळाला जन्म दे. मग बघुया...कारण मुलं जन्माला घालणं आणि आई होणं हे फार कठीण असतं. पण, मला मुलं खूप आवडतात आणि मी त्यांच्यावर प्रेमही करते". 

"मी नेहमी अनाथ मुलांचा विचार करते. मी काही अनाथ मुलांना दत्तकही घेतलं आहे. पण, त्यांना ही गोष्ट माहीत नाही. मी त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलते. मी त्यांना ही गोष्ट कळू देत नाही. त्यांना एक उत्तम आयुष्य देण्याचा मी प्रयत्न करत आहे. एका मुलाचं पालकत्व घेणं ही फार मोठी जबाबदारी असते. हेच कारण आहे की माझ्याकडे पाळीव प्राणी नाही", असंही अमीषा म्हणाली. 

टॅग्स :अमिषा पटेलसेलिब्रिटी