Join us

'गदर २' मधील सकीनाला सिनेमाची ऑफर देताना घाबरायचे मोठे निर्माते, अभिनेत्री म्हणाली-मला त्या....

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 11:39 IST

अमिषा पटेल 'गदर २' सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने अनेक खुलासे केलेत.

अमिषा पटेल नुकत्याच रिलीज झालेल्या 'गदर २' सिनेमामुळे चर्चेत आहे. 'गदर २'ने बॉक्स ऑफिसवर 500 कोटींचा आकडा पार करत सुपरहिट ठरला आहे. सध्या सर्वत्र गदर २ची चर्चा रंगली आहे. अभिनेत्रीच्या करिअरमधला सर्वात सुपरहिट सिनेमा म्हणून नोंद करण्यात आली आहे. मात्र याआधी अभिनेत्रीला फारसे मोठे सिनेमे मिळाले नाहीत. आता अभिनेत्रीने खुलासा केला की तिला सिनेमात घेण्यासाठी निर्माते घाबरायचे.  

अमिषाने नुकताच सिद्धार्थ काननला दिलेल्या मुलाखतीत अनेक खुलासे केले. या मुलाखती दरम्यान तिने सांगितलं की मला बऱ्याच गोष्टींचा पश्चाताप आहे. मी संजय लीला भन्साळी यांच्या सिनेमात काम करण्यास नकार दिला होता माझ्या मॅनेजरच्या सांगण्यावरुन याचा मला खूप पश्चाताप आहे. यामागाचं कारण तिचा मॅनेजरल असल्याचं तिनं सांगितलं.   

अमिषा म्हणाली माझ्या मॅनेजरची आणि संजय लीला भन्साळी यांचं वेगळेवेगळे विचार होते. ती म्हणाली, मी खूप चांगल्या प्रोजेक्टवर चर्चा होती. पण मला त्या सिनेमाचे नाव घ्यायचे नाही कारण तो सिनेमा आता बनला आहे. त्यावेळी माझा मॅनेजर आणि संजय लीला भन्साळी यांचं एकमत होत नव्हते. ज्यावेळी  मी त्या मॅनेजरपासून वेगळे झाले तेव्हा भन्साळी यांनी मला सांगितले की, अनेकवेळा त्यांना माझ्यासोबत काम करायचे होते पण माझ्या मॅनेजरमुळे ते करता आलं नाही.  अमिषाने सांगितले की, तिला नंतर कळले की संजय लीला भन्साळींशवाय यशराज फिल्म्स आणि साजिद नाडियाडवाला सारखे इतर अनेक मोठे निर्मात्यांना तिच्यासोबत काम करायचे होते मात्र तिच्या मॅनेजरमुळे ते तिच्याकडे जाण्यास घाबरत होते.

टॅग्स :अमिषा पटेल