Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूडला या ‘मॉँ’ची सदैव भासेल उणीव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2017 16:14 IST

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री तथा ‘मॉँ’ म्हणून ओळखल्या जाणाºया रिमा लागू यांचे गुरुवारी पाहटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. कोकिलाबेन ...

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री तथा ‘मॉँ’ म्हणून ओळखल्या जाणाºया रिमा लागू यांचे गुरुवारी पाहटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘हम आपके हैं कौन’ आणि ‘कल हो न हो’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारणाºया रिमा लागू यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण बॉलिवूड सून्न झाले आहे. पडद्यावर ममता आणि स्नेह असलेली ‘मॉँ’ साकारताना त्यांनी अनेक चित्रपटांमधील भूमिका जिवंत केल्या आहेत. ‘मैने प्यार किया’, ‘साजन’, ‘वास्तव’, ‘कुछ कुछ होता हैं’ आणि ‘हम साथ साथ हैं’ या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. रिमा यांच्याप्रमाणेच आणखीही काही अभिनेत्री होत्या, ज्यांनी बॉलिवूडमध्ये ‘मॉँ’ची भूमिका जिवंत केली आहे. आज या अभिनेत्री आपल्यात जरी नसल्या तरी त्यांची बॉलिवूडला सदैव उणीव भासेल यात शंका नाही. निरुपा रॉय‘दिवार’ या चित्रपटातील ‘मेरे पास मॉँ हैं’ हा डायलॉग जरी आठवला तरी, निरुपा रॉय यांची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. अभिनेत्री निरुपा रॉय अशा अभिनेत्री होत्या ज्यांनी पडद्यावर ‘मॉँ’ची भूमिका अतिशय खुबीने साकारली होती. त्यांनी अनेक बॉलिवूड स्टार्सच्या आईची भूमिका साकारली होती. त्यांनी साकारलेली ‘मॉँ’ची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड भावत असे. दमदार अभिनय, स्नेह, भावनिक साद असे अनेक पैलू त्यांच्या भूमिकेत असायचे. बºयाचदा निरुपा रॉय यांचा पडद्यावरील अभिनय बघताना प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू यायचे. ‘दिवार’ या चित्रपटातील निरुपा रॉय यांचा अभिनय खूपच सर्वश्रेष्ठ मानला जातो.अचला सचदेव अचला सचदेव यांनादेखील ‘मॉँ’च्या भूमिकेसाठी ओळखले जात होते. अचला सचदेव यांनी १९६५ मध्ये आलेल्या ‘वक्त’ या चित्रपटात सुनील दत्त, राजकुमार आणि शशी कपूर यांच्या ‘मॉँ’ची भूमिका साकारली होती. ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटात त्यांनी राज कपूर तर ‘प्रेमपुजारी’मध्ये त्यांनी देव आनंद यांच्या ‘मॉँ’ची भूमिका साकारली होती. लीला चिटणीस ज्या काळात लीला चिटणीस यांनी चित्रपटांमध्ये एंट्री केली होती, त्या काळात अन्य कुठल्याही अभिनेत्रीला ‘मॉँ’च्या भूमिकेसाठी स्थान पक्के करणे शक्य नव्हते. लीला यांनी ‘गाईड’ या चित्रपटात अभिनेता देव आनंद यांच्या ‘मॉँ’ची भूमिका साकारली होती. चित्रपटातील दमदार अभिनयाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुकही केले गेले. पुढे लीला चिटणीस यांना ‘मॉँ’ या भूमिकेसाठीच ओळखले जाऊ लागले. याच भूमिकेने त्यांना पुरेसे यशही मिळवून दिले. आपल्या करिअरमध्ये त्यांनी अनेक यशस्वी अभिनेत्यांच्या ‘मॉँ’ची भूमिका साकारली. त्या काळातील लिजेंड्री अभिनेते देव आनंद, दिलीप कुमार, राज कुमार यांच्याबरोबरच्या त्यांच्या भूमिका आजही जिवंत आहेत.