अक्षयला पूर्वी म्हणत होते,‘फर्निचर’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2016 14:44 IST
काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला ‘हाऊसफुल्ल ३’ चित्रपटाला बॉक्स आॅफीसवर तुफान प्रतिसाद मिळतोय. आता बॉलीवूडमध्ये अक्षय कुमारने स्वत:ची आपले वेगळे ...
अक्षयला पूर्वी म्हणत होते,‘फर्निचर’!
काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला ‘हाऊसफुल्ल ३’ चित्रपटाला बॉक्स आॅफीसवर तुफान प्रतिसाद मिळतोय. आता बॉलीवूडमध्ये अक्षय कुमारने स्वत:ची आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.त्याचा ‘बेबी’, ‘हॉलीडे’, ‘एअरलिफ्ट’ यासोबतच त्याचा ‘हाऊसफुल्ल ३’ हा चित्रपट देखील रिलीज झाला आहे. चित्रपटाला मिळत असलेल्या यशानिमित्त एक पार्टी आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी अक्षय कुमारने सांगितले,‘ मी जेव्हा इंडस्ट्रीत आलो तेव्हा मला फर्निचर म्हणून बोलावले जात असे. मला स्क्रिप्ट आवडली की मी लगेचच कोणत्याही चित्रपटाला होकार द्यायचो. म्हणून माझी सुरूवातीच्या काळात ‘खिलाडी’ म्हणून प्रतिमा तयार झाली होती.’