Join us
Daily Top 2Weekly Top 5

​दीपिका-शाहरुखमध्ये ‘आॅल इज वेल’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2016 11:07 IST

दीपिका पदुकोन बॉलीवूडमधील ए-लिस्ट अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. इंडस्ट्रीतील सर्वात मोठा स्टार शाहरुखसोबत तिने चंदेरी दुनियेत पहिले पाऊल ठेवले ...

दीपिका पदुकोन बॉलीवूडमधील ए-लिस्ट अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. इंडस्ट्रीतील सर्वात मोठा स्टार शाहरुखसोबत तिने चंदेरी दुनियेत पहिले पाऊल ठेवले होते. २००७ मध्ये आलेल्या ‘ओम शांती ओम’मधील शांतीप्रिया आजही प्रेक्षकांना आठवते. नऊ वर्षांच्या फिल्म करिअरमध्ये तिने मिळवलेले यश हेवा वाटावे असेच आहे.मध्यंतरी शाहरुख आणि दीपिकामध्ये बिनसल्याची चर्चा होती. गेल्या वर्षी किंग खानचा ‘दिलवाले’ आणि डिप्पीचा ‘बाजीराव मस्तानी’ एकाच दिवशी रिलीज झाले होते. या बॉक्स आॅफिस बॅटलमुळे दोघांचे संबंध ताणले गेल्याचे बोलले जात होते. पण या सर्व अफवांना दूर करत नुकतेच हे दोघे शाहरुखच्या घरी जोरदार पार्टी करताना दिसले.‘मन्नत’वर झालेल्या एका पार्टीमध्ये हे दोघांनी खूप धमाल केली. उपस्थितांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख डान्स फ्लोअरवर नाचत असताना दीपिका तेवढ्याच उत्साहाने त्याला ‘चिअर-अप’ करत होती. खूप वेळ दोघे एकमेकांसोबत गप्पा मारत होते. दोघांमध्ये काही वाद झाला होता असे वाटतसुद्ध नव्हते.बेस्ट फ्रेंडस् फॉरेव्हर :दीपिका पदुकोन आणि शाहरुख खानशाहरुख-दीपिका जेव्हा जेव्हा एकत्र येतात, तेव्हा धमाका होतो हे नक्की! ‘ओम शांती ओम’, ‘हॅपी न्यू इअर’ आणि ‘चेन्नई एक्सप्रेस’ दोघांच्या सुपर केमिस्ट्रीमुळे ब्लॉकबस्टर हीट ठरले. तिनेसुद्धा वेळोवेळी तिच्या यशाचे शाहरुखला दिलेले आहे. आता हे दोघे मोठ्या पडद्यावर पुन्हा कधी एकत्र दिसतात याची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.