All Is Not Well : सिद्धार्थ मल्होत्रा आणि वरूण धवन यांच्यात बिनसले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2017 12:24 IST
२०१२ मध्ये रिलीज झालेल्या ‘स्टुडंट आॅफ द ईयर’ चित्रपटातून सिद्धार्थ मल्होत्रा, वरूण धवन आणि आलिया भट्ट यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण ...
All Is Not Well : सिद्धार्थ मल्होत्रा आणि वरूण धवन यांच्यात बिनसले?
२०१२ मध्ये रिलीज झालेल्या ‘स्टुडंट आॅफ द ईयर’ चित्रपटातून सिद्धार्थ मल्होत्रा, वरूण धवन आणि आलिया भट्ट यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटापासून सिद्धार्थ-वरूण यांची बाँण्डिंग चांगलीच जमली. त्यांची ही मैत्री आत्तापर्यंत चांगली होती. अचानक असं काय झालं की त्यांच्यातील संबंध बिघडले? अलीकडेच सिद्धार्थ मल्होत्राचा ३२ वा वाढदिवस त्याने सेलिब्रेट केला. ‘बी टाऊन’च्या जवळपास सर्व सेलिब्रिटींनी त्याला सोशल मीडियावर किंवा घरी जाऊन स्वत: समक्ष अभिनंदन केले. पण, तुम्हाला माहितीये का, त्याचा सगळ्यांत चांगला मित्र वरूण धवन याने त्याला सोशल मीडियावरही नाही आणि भेटून देखील शुभेच्छा दिल्या नाहीत. त्यामुळे या दोघांमधील संबंध बिनसल्याची खमंग चर्चा ‘बी टाऊन’ मध्ये सुरू आहे.वरूण धवनने त्याच्या ‘डिअरेस्ट फ्रेंड’ ला शूभेच्छा का दिल्या नाहीत? याबद्दलच्या चर्चेतून असे कळालेय की, तो सध्या ‘जुडवा २’ च्या तयारीत एकदम बिझी आहे. त्यामुळे त्याला कदाचित सिद्धार्थला वाढदिवसाच्या शुभेच्छा देता आल्या नसतील. ‘बी टाऊन’ मध्ये अलीकडेच पार पडलेल्या ‘डब्बू रत्नानी कॅलेंडर लाँच २०१७’ इव्हेंटवेळी देखील त्याला उपस्थित राहता आले नव्हते. पण, चर्चा अशीही होती की, वरूण धवनने त्याच्या शुभेच्छा कमीत कमी सोशल मीडियावर तरी पोस्ट करायला हव्या होत्या. हीच काही कारणे आहेत की ज्यामुळे ‘बी टाऊन’ च्या सर्व कलाकारांना असे वाटतेय की, सिद्धार्थ-वरूण यांच्यातील मित्रत्वाचे नाते आता कायमचे संपले आहेत. अलीकडेच टेलिकास्ट झालेल्या ‘कॉफी विद करण’ च्या टीव्ही शोमध्ये सिद्धार्थ ‘दाक्षिणात्य ब्युटी’ जॅकलीन फर्नांडिस हिच्यासोबत आला होता. तेव्हा करण जोहरने सिद्धार्थला त्याचे वरूणसोबतचे सध्याचे नातेसंबंध कशाप्रकारचे आहेत याविषयी विचारणा केली. तेव्हा त्याने वरूणसोबतची त्याची मैत्री कशी आता कमी होत आहे, ते दोघे क से दुरावत असल्याचे सांगितले. पण, सिदने हे देखील सांगितले की, आम्ही आम्हाला वेळ मिळाला की भेटत असतो. पण, मग सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीत वरूण का दिसला नाही ? यावरूच सर्व चित्र स्पष्ट आहे की, नक्कीच त्या दोघांमधील संबंध बिघडले आहेत.