आलियाला लागले हॉलिवूडचे वेध
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2016 06:00 IST
प्रियंका चोपडा, दीपिका पदुकोण हॉलिवूडमध्ये बिझी असताना आता चुलबुल्या आलियालाही हॉलिवूड खुणावू लागले आहे. प्रियंका आणि दीपिकाच्या पावलावर पाऊल ...
आलियाला लागले हॉलिवूडचे वेध
प्रियंका चोपडा, दीपिका पदुकोण हॉलिवूडमध्ये बिझी असताना आता चुलबुल्या आलियालाही हॉलिवूड खुणावू लागले आहे. प्रियंका आणि दीपिकाच्या पावलावर पाऊल टाकत हॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा तिने व्यक्त केली आहे. एका मुलाखतीत आलियाने मनातील ही इच्छा बोलून दाखवली. अद्याप हॉलिवूडची कुठलीही आॅफर माझ्याकडे नाही. मात्र हॉलिवूडमध्ये काम करणे मला निश्चितपणे आवडेल, असे आलियाने यावेळी सांगितले. सध्या मी बॉलिवूडमध्ये बिझी आहे. इथे स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करण्यासाठी झटते आहे. यानंतर मात्र मला पुढे जायला आवडेल, असे ती म्हणाली. व्वा, आलिया...तू तर एकदम ‘फास्ट’ निघालीस...आॅल दी बेस्ट बेबी...!!!