Join us

अलियाला या गायिकेला पडद्यावर साकारायचेय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2016 16:47 IST

सध्या अनेक बायोपिक आपल्याला पाहायला मिळत आहे. अनेक गायिका, अभिनेते, राजकारणी यांच्या आयुष्यावर चित्रपट बनवले जात आहेत. बायोपिकचा ट्रेंडच सध्या ...

सध्या अनेक बायोपिक आपल्याला पाहायला मिळत आहे. अनेक गायिका, अभिनेते, राजकारणी यांच्या आयुष्यावर चित्रपट बनवले जात आहेत. बायोपिकचा ट्रेंडच सध्या बॉलिवुडमध्ये रुजला आहे. अभिनेत्री अलिया भट्टलाही आता बायोपिकमध्ये काम करायचे आहे. अलियाला नाझिया हसन या गायिकेला पडद्यावर साकारायचे असल्याचे तिने सांगितले. सीएनक्सशी बोलताना अलिया म्हणाली, "नाझिया हसनची मी खूप मोठी फॅन आहे. त्यांचा मृत्यू झाला तेव्हा त्या वयानेही खूपच लहान होत्या. त्यामुळे त्यांच्यावर कोणता चित्रपट बनवला गेला तर त्यासाठी मी अगदी योग्य आहे असे मला वाटते. त्यांचे आप जैसा कोई हे गाणे तर मला खूपच आवडते. त्यामुळे या चित्रपटात एखादे गाणेही मला गायला आवडेल."