अलियाचा ‘प्रिस्मा’ फोटो चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2016 14:28 IST
सोेशल नेटवर्किंग साइट्सवर एका नव्या अॅपने प्रवेश केला असून या नव्या अॅपचा मोह ‘उडता पंजाब’ फेम आलिया भट्टला आवरता ...
अलियाचा ‘प्रिस्मा’ फोटो चर्चेत
सोेशल नेटवर्किंग साइट्सवर एका नव्या अॅपने प्रवेश केला असून या नव्या अॅपचा मोह ‘उडता पंजाब’ फेम आलिया भट्टला आवरता आला नाही. तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हाच ‘प्रिस्मा’ अॅप वापरत आलियाने एक फोटो पोस्ट केला आहे, ज्याला तिच्या चाहत्यांकडून बरीच पसंती मिळत आहे. या ‘प्रिस्मा क्लिक’अॅपच्या किमयेने आलियाला फोटो एखाद्या चित्रकाराने अधिक कलात्मकतेने साकारलेल्या चित्राप्रमाणे भासत आहे. ‘उडता पंजाब’ या चित्रपटाच्या यशानंतर लंडनमध्ये सुट्टीसाठी गेलेल्या आलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो पोस्ट करण्याचे सत्र सुरुच ठेवले होते. त्यातही तिने नुकताच पोस्ट केलेला ‘प्रिस्मा’ फोटो सध्या विशेष चर्चेत आहे.