Join us

Raha Kapoor : छोट्या आलियाची पहिली झलक, 'राहा कपूर'ला घेऊन आलिया रणबीरचा फेरफटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 17:37 IST

काही वेळापुर्वीच रणबीर आणि आलिया चिमुकल्या राहा ला घेऊन बाहेर पडले. पहिल्यादांच तिघे एकत्र बाहेर पडले आहेत. त्यांचे फोटो व्हायरल झालेत.

बीटाऊनमधील (BTown) लाडके कपल रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट (Alia Bhat Kapoor) नुकतेच आई बाबा झाले आहेत. ६ नोव्हेंबर रोजी आलियाने मुलीला जन्म दिली. तिचे नाव राहा असे ठेवण्यात आले. लेकीच्या जन्मानंतर काहीच दिवसात रणबीर कामावर परतला. तर दुसरीकडे आलिया सध्या योगा आणि इतर अॅक्टिव्हिटी करत आरोग्याची काळजी घेत आहे. रोजच ती योगा सेंटरमध्ये जाताना दिसते. तर काही वेळापुर्वीच रणबीर आणि आलिया चिमुकल्या राहा ला घेऊन बाहेर पडले. पहिल्यादांच तिघे एकत्र बाहेर पडले आहेत. त्यांचे फोटो व्हायरल झालेत.

सोशल मीडियावर रणबीर आणि आलिया राहा ला घेऊन बाहेर पडल्याचे फोटो वेगाने व्हायरल होत आहेत. यामध्ये चिमुकल्या राहाला स्ट्रोलर मध्ये ठेवले आहे. राहाचा चेहरा तर यात दिसत नाही मात्र पहिल्यांदाच हे कुटुंब बाहेर एकत्र दिसल्याने चाहते भलतेच खूश झाले आहेत. रणबीरने स्ट्रोलर धरले आहे तर आलिया त्याच्यासोबत चालताना दिसत आहे. दोघेही अगदी साध्या लुकमध्ये दिसत आहे.

आलिया रणबीरचे हे फोटो पाहून चाहत्यांना उत्सुकता आहे ते राहाची झलक कधी दिसते याची. राहा कपूरचा चेहरा दाखवा आम्ही तिला पाहू शकतो का अशा कमेंट चाहते या फोटोंवर करत आहेत. आलिया सध्या पुन्हा सक्रिय झाली आहे. बॉलिवुड पार्टी असो किंवा कोणते सेलिब्रेशन आलिया आणि रणबीर एकत्र दिसत आहेत. 

टॅग्स :आलिया भटरणबीर कपूरपरिवारबॉलिवूडमुंबई