Join us
Daily Top 2Weekly Top 5

आई-बहीणीसोबत आलिया डेटवर....

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2016 10:14 IST

 सध्या आलिया ‘बद्रिनाथ की दुल्हनिया...’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. पण ती नुकतीच तिची आई सोनी राझदान आणि बहीण शहीन ...

 सध्या आलिया ‘बद्रिनाथ की दुल्हनिया...’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. पण ती नुकतीच तिची आई सोनी राझदान आणि बहीण शहीन भट्ट हिच्यासोबत डिनर डेटवर गेली होती. त्याचा फोटो तिने सोशल मीडियावर अपलोड केला आहे.या फोटोला तिने कॅप्शन दिले आहे की,‘ डेट नाईट विथ द गर्ल्स’. सोनी आणि आलिया यांनी एकाच पांढºया रंगाचा टॉप घातला आहे. या टॉपमध्ये दोघीही अतिशय सुंदर दिसत आहेत. आलिया सध्या ‘ उडता पंजाब’ च्या प्रमोशनमध्ये शाहीद कपूर, दिलजीत दोसंग आणि करिना कपूर खान यांच्यासोबत बिझी आहे.चित्रपट १७ जूनला रिलीज होणार आहे. आलियासाठी हे वर्ष अतिशय यशदायी ठरले आहे. ‘कपूर अ‍ॅण्ड सन्स’ पासून तिचे बॉक्सआॅफीसवर चित्रपट हिट होत आहेत.