अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. सध्या हे कथित कपल एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आले आहे. होय, रणबीर व आलियाचा एक फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतो आहे. आता या फोटोत आलिया व रणबीर एकमेकांशेजारी बसलेले आहेत. पण रणबीर आपल्या फोनमध्ये व्यस्त आहे आणि आलिया त्याच्या बाजूला चेहरा पाडून शून्यात बघते आहे. आता असे का, हे मात्र आम्हाला ठाऊक नाही. रणबीरच्या फोनच्या वेड्यापायी आलिया नाराज आहे की शूटींगमुळे थकली आहे, हे कळायला मार्ग नाही.
काय म्हणता? रणबीर कपूरच्या फोनच्या वेडापायी आलिया भट्ट त्रस्त?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2018 15:30 IST
होय, रणबीर व आलियाचा एक फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतो आहे. आता या फोटोत आलिया व रणबीर एकमेकांशेजारी बसलेले आहेत. पण...
काय म्हणता? रणबीर कपूरच्या फोनच्या वेडापायी आलिया भट्ट त्रस्त?
ठळक मुद्देहा फोटो ‘ब्रह्मास्त्र’च्या सेटवरचा असल्याचे कळते. ‘ब्रह्मास्त्र’मध्ये आलिया व रणबीर पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. अद्याप दोघांनीही आपले नाते अधिकृत केले नाही. पण गेल्या काही दिवसांत हे नाते कुणापासूनही लपलेले नाही. दोघेही लवकरच लग्न करणार, अशीही चर्चा आहे.