Join us

अभिनय सोडून आलिया भट का बनलीय शेफ, हे आहे यामागचे रंजक कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 16:29 IST

आलिया भटचे केक बनवतानाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

ठळक मुद्देअर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूरच्या फॅनकाईंट फाऊंडेशन मार्फत आलियाच्या काही फॅन्सना तिला भेटण्याची नुकतीच संधी देण्यात आली. एवढेच नव्हे तर एका फॅनसाठी आलिया शेफ बनली आणि तिने तिच्यासाठी केक बनवला.

आलिया भटला चांगलीच फॅन फॉलोव्हिंग असून तिच्याविषयी जाणून घ्यायची तिच्या चाहत्यांची नेहमीच इच्छा असते. ती देखील तिच्या चाहत्यांना कधीच नाराज करत नाही. आता तर आलियाने तिच्या फॅन्ससाठी एक खास गोष्ट केली असून याच गोष्टीची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूरच्या फॅनकाईंट फाऊंडेशन मार्फत आलियाच्या काही फॅन्सना तिला भेटण्याची नुकतीच संधी देण्यात आली. एवढेच नव्हे तर एका फॅनसाठी आलिया शेफ बनली आणि तिने तिच्यासाठी केक बनवला. 

अंशुलाच्या फाऊंडेशनद्वारे नेहमीच वेगवेगळ्या फॅन्सना आपल्या आवडत्या कलाकारांना भेटण्याची संधी मिळते. तिच्या फाऊंडेशनशी निगडीत असलेल्या वर्षा नावाची मुलगी आलियाची खूप मोठी फॅन असून तिला आलियासाठी केक बनवण्याची इच्छा असल्याचे अंशुलाला माहीत होते. त्यामुळे अंशुलाने या खास दिवसासाठी वर्षाच्याच वाढदिवसाची निवड केली. पण आलियानेच वर्षासाठी केक बनवला. एवढेच नव्हे तर तिचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला. वर्षा यामुळे प्रचंड खूश झाली. तिला तिचे अश्रू आवरत नव्हते. आलियाने तिचे डोळे पुसत तिला हसवले. वर्षाच्या आयुष्यात हा खास क्षण आणल्याबद्दल तिने अंशुलाच्या फाऊंडेशनचे आभार मानले. 

आलियाने करण जोहरच्या ‘स्टुडन्ट ऑफ द इयर’ या चित्रपटामध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर तिने 2 स्टेट्स, शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स, उडता पंजाब, राजी, गली बॉय, डिअर जिंदगी यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. ती लवकरच सडक 2 आणि गंगुबाई काठियावाडी, ब्रम्हास्त्र, आरआरआर यांसारख्या चित्रपटामध्ये झळकणार आहे. 

टॅग्स :आलिया भट