बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आलिया भटचा ३३ वा वाढदिवस नुकताच झाला. १५ मार्चला आलिया भटच्या वाढदिवसाचं जबरदस्त सेलिब्रेशन झालं. तिने हा दिवस आपल्या चाहत्यांसाठी अत्यंत खास बनवला आहे. स्वतःच्याच वाढदिवशी आलियाने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. अभिनेत्रीसोबतच एक यशस्वी निर्माती असलेल्या आलियाने आता व्यावसायिक क्षेत्रात आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. तिने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने 'इटरनल किड्स' या नव्या प्रॉडक्शन हाऊसची घोषणा केली.
काय आहे 'इटरनल किड्स'?आलियाने आपल्या सोशल मीडियावरून या नव्या उपक्रमाची माहिती दिली. 'इटरनल किड्स' हे तिच्या 'इटरनल सनशाइन प्रोडक्शन्स'चा एक नवीन भाग असून, याचा मुख्य उद्देश लहान मुलांसाठी कल्पक आणि मनाला भिडणाऱ्या कथा, चित्रपट आणि शोज तयार करणे हा आहे. आलियाने पोस्टमध्ये मजेशीरपणे लिहिले की, "आमच्या प्रोडक्शन कंपनीला एक 'बेबी' झाला आहे; भेटा आमच्या 'इटरनल किड्स'ला." आलियाने ही खास बातमी शेअर करताच चाहत्यांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
या नव्या प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत 'देअर्स सी अँड जी अँड एम' नावाची पहिली कथा समोर येणार आहे. ही कथा आलियाच्या आजोबांनी सांगितलेल्या गोष्टींवर आधारित आहे. आलिया आणि तिची बहीण शाहीन भट याच गोष्टी ऐकून मोठ्या झाल्या आहेत. बालपणाचा हा अनमोल ठेवा आता सर्व मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी आलिया खूप उत्सुक आहे. 'इटरनल किड्स'च्या माध्यमातून अनेक नवनवीन प्रोजेक्ट्सवर काम सुरू झाल्याचेही तिने यावेळी सांगितले. आलिया सध्या तिच्या 'अल्फा' या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे.
Web Summary : Alia Bhatt, celebrating her 33rd birthday, launched 'Eternal Kids,' a production house focused on creating content for children. It's a part of her 'Eternal Sunshine Productions,' aiming to deliver imaginative stories. Her first project is based on her grandfather's stories.
Web Summary : आलिया भट्ट ने अपने 33वें जन्मदिन पर 'एटर्नल किड्स' लॉन्च किया, जो बच्चों के लिए सामग्री बनाने पर केंद्रित एक प्रोडक्शन हाउस है। यह उनकी 'एटर्नल सनशाइन प्रोडक्शंस' का एक हिस्सा है, जिसका उद्देश्य काल्पनिक कहानियाँ सुनाना है। उनका पहला प्रोजेक्ट उनके दादाजी की कहानियों पर आधारित है।