आलिया भट्ट सध्या यशाच्या अत्त्युच्च शिखरावर आहे. ‘राजी’पाठोपाठ आलियाचा नुकताच रिलीज झालेला ‘गली बॉय’ बॉक्स आॅफिसवर बक्कळ कमाई करतोय. पण गेल्या काही दिवसांपासून आलियाच्या चित्रपटांपेक्षा तिच्या लव्ह लाईफचीच अधिक चर्चा होतेय. रणबीर कपूरसोबत असतानाचे तिचे ‘सॅड’ व्हिडीओ आणि फोटोंवरून वेगवेगळे तर्क काढले जात आहे. रणबीर व आलियाच्या रिलेशनशिपमध्ये सगळे काही ‘आॅल वेल’ नसल्याचे बोलले जात आहे. अलीकडे आलिया व रणबीरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोत रणबीर फोनमध्ये बिझी होता तर त्याच्या बाजूला आलिया दु:खी, खिन्न चेहरा करून बसलेली होती. हा फोटो पाहून, रणबीरसोबत असताना आलिया इतकी दु:खी का, असा प्रश्न अनेकांना पडला होता. तर आता आलियाने स्वत:च या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.
अखेर रणबीर कपूरसोबतच्या त्या ‘सॅड’ फोटोवर बोलली आलिया भट्ट...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 14:29 IST
गेल्या काही दिवसांपासून आलियाच्या चित्रपटांपेक्षा तिच्या लव्ह लाईफचीच अधिक चर्चा होतेय. रणबीर कपूरसोबत असतानाचे तिचे ‘सॅड’ व्हिडीओ आणि फोटोंवरून वेगवेगळे तर्क काढले जात आहे.
अखेर रणबीर कपूरसोबतच्या त्या ‘सॅड’ फोटोवर बोलली आलिया भट्ट...!
ठळक मुद्देमला कुणालाही स्पष्टीकरण द्यायची गरज वाटत नाही. कारण खरे काय, हे फक्त मला ठाऊक आहे आणि त्यामुळे अन्य लोक काय विचार करतात, याने मला काहीही फरक पडत नाही, असे आलियाम्हणाली.