आलिया भट्टच्या बाफ्टा (BAFTA) अवॉर्ड्समधील एका जुन्या मुलाखतीचा व्हिडिओ सध्या पुन्हा चर्चेत आला असून, त्यातील तिच्या विचित्र हावभावांमुळे (Expressions) तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. एका मुलाखतीत जेव्हा आलियाला 'बेस्ट प्लॉट ट्विस्ट' असलेल्या सिनेमाबद्दल विचारण्यात आले, तेव्हा तिने 'गॉन गर्ल'चे नाव घेतले. मात्र, त्या चित्रपटातील प्रसंगांचे वर्णन करताना तिने दिलेले हावभाव पाहून नेटकऱ्यांनी तिची चांगलीच खिल्ली उडवली. नुकत्याच पार पडलेल्या 'मिलन फॅशन वीक'मध्ये आलियाने या प्रकरणावर मौन सोडत आपली बाजू मांडली आहे.
या ट्रोलिंगला उत्तर देताना आलिया म्हणाली की, "इतकी चर्चा का होत आहे? कदाचित माझ्या हावभावांमुळे असेल. खरं तर 'गॉन गर्ल'मधील ट्विस्ट मला खूप आवडतो, पण मी तो चित्रपट १० वर्षांपूर्वी पाहिला होता. मुलाखतकाराने जेव्हा त्यातील मोनोलॉगबद्दल विचारलं, तेव्हा मी जुन्या आठवणीत हरवून गेले होते आणि माझ्या डोक्यात तो प्रसंग आठवण्याचा प्रयत्न करत होते."
स्वतःबद्दल बोलताना ती मिश्किलपणे म्हणाली की,"मी एक कूल मुलगी आहे. प्रेमळ आहे. पण मी कूलपेक्षाही जास्त प्रेमळ होऊ शकते. खरं तर मला नाही वाटत मी इतकी कूल आहे. मी अनकूलही वाटू शकते असं माझी बहीण सांगते."
एक अभिनेत्री म्हणून आलियाने अनेकदा तिच्या चुकांमधून शिकल्याचे दाखवून दिले आहे. बाफ्टा अवॉर्ड्समध्ये तिने हिंदीतून केलेली सुरुवात चर्चेत होती. तरी एका लहानशा चुकीमुळे तिला टीकेचा सामना करावा लागला. मात्र, प्रत्येक वेळी स्वतःवर होणाऱ्या टीकेला हसून आणि संयमाने उत्तर देण्याची आलियाची ही पद्धत चाहत्यांना पुन्हा एकदा भावली आहे.
Web Summary : Alia Bhatt addressed criticism regarding her expressions during a BAFTA interview about 'Gone Girl' at Milan Fashion Week. She playfully acknowledged being perceived as both cool and uncool, emphasizing her ability to learn from mistakes and handle criticism with grace.
Web Summary : आलिया भट्ट ने मिलान फैशन वीक में 'गॉन गर्ल' के बारे में बाफ्टा साक्षात्कार के दौरान अपनी अभिव्यक्ति के बारे में आलोचना को संबोधित किया। उन्होंने मजाकिया ढंग से शांत और अशांत दोनों के रूप में माना जाने की बात स्वीकार की, गलतियों से सीखने और अनुग्रह के साथ आलोचना को संभालने की अपनी क्षमता पर जोर दिया।