गेल्या काही दिवसांपासून भारत-पाक दोन्ही देशात तणावाची परिस्थिती होती. यापुढेही पाकिस्तानसोबत केवळ दहशतवाद आणि पीओकेवरच चर्चा होईल असं काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करताना जाहीर केलं. देशात अशी परिस्थिती असताना बॉलिवूड सेलिब्रिटी मात्र मौन होते. त्यांच्यावर सोशल मीडियावर जबरदस्त टीका झाली. आता इतक्या दिवसांनी आलिया भटने (Alia Bhatt) आज भारत देशासाठी आणि भारतीय सैन्यासाठी पोस्ट लिहिली आहे.
काय आहे आलिया भटची पोस्ट?
आलिया भट लिहिते, "गेली काही रात्र फार वेगळी होती. देशात वेगळीच शांतता पसरली होती. गेले काही दिवसांपासून आपण ही शांतता अनुभवली. अस्वस्थता होती. प्रत्येक घरात डिनर टेबलवर, बातम्यांवर आणि एकमेकांच्या संभाषणात एक प्रकारची चिंता होती. तिकडे सीमेवर आपले जवान सावध आहेत, देशाचं रक्षण आहेत याची सतत जाणीव होत होती. आपण घरात सुरक्षित झोपावं म्हणून अनेक धाडसी पुरुष आणि महिला जीव धोक्यात घालून तिकडे गस्त घालत होते. हे सत्य खरोखरंच काळजाला भिडणारं आहे. हे फक्त शौर्य नाही तर योगदान आहे. आणि प्रत्येक वर्दीच्या मागे त्यांची आई आहे जी एकही रात्र झोपू शकलेली नाही. त्या आईला याची जाणीव आहे की तिचं मूल कधी काय होईल माहित नाही अशा भयावह रात्रीचा सामना करत आहे."
रविवारी आपण सर्वांना मातृत्व दिन साजरा केला. आईला शुभेच्छा दिल्या. पण मला सतत त्या मातांची आठवण आली ज्यांच्या पोटी खरे हिरो जन्माला आले. आपण शहीदांना श्रद्धांजली वाहिली. त्यांचं नाव आज देशाच्या कानाकोपऱ्यात कायमचं लिहिलं गेलं आहे. त्यांच्या कुटुंबियांना बळ मिळो."
तर आज आणि येणारी प्रत्येक रात्र आपण तणावातून निर्माण होणारी शांतता कमी आणि शांतीतून निर्माण होणाऱ्या शांततेची आशा करुया. प्रार्थना करणाऱ्या आणि आपले अश्रू थांबवणाऱ्या त्या प्रत्येक आईवडिलांच्या आपण सोबत आहोत. कारण तुमची ताकदच या देशाला प्रेरणा देणारी आहे. आपल्या जवानांसाठी, भारत देशासाठी आपण सगळे उभे राहू. जय हिंद."