Alia Bhatt Cannes 2025 : अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) नुकतंच तिने ७८ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पण केलं. कान्सच्या रेड कार्पेटवर आलियाने जलवा दाखवला. तिचे एकापेक्षा एक लूक पाहून चाहते घायाळ झाले. 'कान्स'च्या पहिल्या दिवशी आलिया ही रिया कपूरने स्टाईल केलेल्या गाऊनमध्ये दिसली. आलियाच्या दुसऱ्या लूकने तर प्रेक्षकांना प्रेमातच पाडलं. गुचीने बनवलेली क्रिस्टल साडी नेसून ती रेड कार्पेटवर अवतरली होती. पण, यावेळी Oops मोमेंटची शिकार होता होता आलिया राहिली.
आलियाचा कान्सच्या रेड कार्पेटवरील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. Gucci या लक्झरी ब्रॅन्डच्या साडीवर आलियानं एक हिऱ्यांचा नेकलेस परिधान केला होता. जेव्हा आलिया ही रेड कार्पेटवर पोज देत होती, तेव्हा अचानक तिच्या गळ्यातील तो हार तुटला. पण, आलियानं आपल्या गळ्यातील हार तुटल्याचं लक्षात येताच प्रसंगावधान राखतहातानाचे नेकलेस पडकला. एवढेच काय तर कुणालाही कळू न देता तिने त्याच अवस्थेत अगदी सुंदर पोजही दिल्या. पण, हे सर्व कॅमेऱ्यात कैद झालं. ज्या आत्मविश्वासाने सर्व परिस्थिती सांभाळली, ते पाहून सर्वांनीच तिचं कौतुक केलं.
आलिया भट दुसऱ्यांदा आई होणार?
आलियाचा कान्समधील एका लूकसाठी निळा शिमरी गाऊन परिधान केला होता. यामध्ये आलिया डॅझलिंग स्टार सारखी शाई करत होती. या लूकमधले तिचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. काही फोटोत तिचे पोट दिसत असल्याचा अनेकांनी दावा केला आणि ती प्रेग्नंट असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. आलियाने मात्र यावर अद्यापही कोणती प्रतिक्रिया दिलेली नाही. आता आलिया नक्की यावर काय प्रतिक्रिया देतेय हे पाहणं महत्त्वांच आहे.
दरम्यान आलिया भटने आधीच एका मुलाखतीत दुसऱ्यांदा आई होण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसंच यावेळी मुलगा झाला तर त्याचं नावही ठरवलं असल्याचं तिनं सांगितलं होतं. आलियाची लेक राहा आता २ वर्षांची आहे.