Join us

आलिया भटचा हा घायाळ करणार अंदाज तुम्ही पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2019 21:00 IST

सध्या आलिया भट रणबीर कपूरच्या फॅमिलीसोबत न्यूयॉर्कमध्ये न्यू ईअर सेलिब्रेट करतेय. सोशल मीडियावर आलियाचे कपूर फॅमिलीसोबतचे फोटो व्हायरल झाले आहेत.

ठळक मुद्देआलियाने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका फोटो शेअर केला आहे रणबीर व आलिया दोघेही लग्न करतील, असेही मानले जात आहे

सध्या आलिया भटरणबीर कपूरच्या फॅमिलीसोबत न्यूयॉर्कमध्ये न्यू ईअर सेलिब्रेट करतेय. सोशल मीडियावर आलियाचे कपूर फॅमिलीसोबतचे फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये आलिया एन्जॉय करताना दिसतेय.     

आलियाने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका फोटो शेअर केला आहे. जो न्यूयॉर्कमधील तिचा नव्या वर्षातील फोटो आहे. ज्यात ती खूपच सुंदर, हॉट आणि स्टायलिश दिसतेय. या फोटोला आलियाने, 'हॅलो 2019' असे कॅप्शन दिले आहे. 

रणबीर आणि आलियाच्या अफेअरबाबत बोलायचे झाले तर या वर्षांत रणबीर व आलिया दोघेही लग्न करतील, असेही मानले जात आहे. आलियाचे पापा महेश भट्ट यांनी अलीकडेच याबाबतचे संकेत दिले होते.  द टेलिग्राफला दिलेल्या मुलाखतीत महेश भट्ट आलिया व रणबीरच्या रिलेशनशिपवर बोलले होते. आलिया व रणबीर एकमेकांच्या प्रेमात आहे, हे जगजाहिर आहे. आता केवळ हे कपल आपल्या रिलेशनशिपची अधिकृत घोषणा कधी करते, ते फक्त बघायचेय. आलिया आणि रणबीर ‘ब्रह्मास्त्र’ शूटिंगमध्ये बिझी आहेत.या सिनेमाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी करतोय. याच चित्रपटाच्या सेटवर आलिया व रणबीर एकमेकांत गुंतल्याचे म्हटले जाते. पुढच्या महिन्यात आलियाचा रणवीर सिंग सोबतचा 'गली बॉय' सिनेमा रिलीज होणार आहे. तसेच आलिया करण जोहरच्या मल्टीस्टारर 'कलंक' सिनेमात सुद्धा दिसणार आहे.  

टॅग्स :आलिया भटरणबीर कपूर